spot_img
ब्रेकिंगविरोधी पक्षनेते वडेट्टीवार तापले, जरांगे यांच्यावर केला गंभीर आरोप, पहा

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार तापले, जरांगे यांच्यावर केला गंभीर आरोप, पहा

spot_img

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची टीका; धमकावून प्रश्न सुटत नसतात

मुंबई | वृत्तसंस्था

मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचे ऐकून निर्णय घेतल्यास भविष्यात त्यांचे मोठे नुकसान होईल, असा धोयाचा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. मराठा तरुणांनी जरांगे पाटील यांच्या म्हणण्यावर सर्वकाही ठरवू नये. मराठा तरुणांनी अभ्यास करुन आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला.

ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, माझे मुळात म्हणणे हे आहे की, मराठा समाजाला ३७२ जाती असलेल्या ओबीसी प्रवर्गात येऊन फार काही फायदा मिळणार नाही. मराठा समाज ओबीसीत आला की ओपन प्रवर्गात फार जाती राहणार नाहीत. म्हणजे जिथे नोकर्‍यांचा आणि सोयीसवलतींचा विषय येतो, त्या पातळीवर मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल. अशा परिस्थितीत मराठा तरुणांनी आपण कोणाला साथ देतोय, आपले भलं कशात आहे, याचा विचार करावा. अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर जो लाठीमार झाला त्यानंतर मनोज जरांगे पाटील हिरो म्हणून पुढे आले.

त्यानंतर ’हम झुका सकते है’ अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. मराठा समाजाने दिलेल्या पाठबळामुळे त्यांच्या मनात गर्व निर्माण झाला. त्यामुळे ते राज्य सरकारला धमकावत राहिले. पण धमयांनी प्रश्न सुटणार आहेत का? कुठल्याही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसून कराव्या लागतात.

ज्या काही प्रक्रिया आहेत, त्यानुसार कोणालाही कुठेही घुसवता येत नाही. आता त्यांच्या डोयात हे खुळ घुसलंच असेल तर ते मागणी सातत्याने करत राहतील. मग आता सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देऊन टाका. गुजराती कुणबी, मारवाडी कुणबी, लिंगायत कुणबी, असेच होऊन जाऊ दे, अशी खोचक टिप्पणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...