spot_img
ब्रेकिंगPolitics News Today: भाजप नेत्या पंकजा मुंडे पराभवानंतरही होणार खासदार? महाराष्ट्र...

Politics News Today: भाजप नेत्या पंकजा मुंडे पराभवानंतरही होणार खासदार? महाराष्ट्र भाजप पाठवणार केंद्रीय नेतृत्वाला ‘प्रस्ताव’

spot_img

बीड। नगर सहयाद्री-
बीड लोकसभा मतदार संघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महायुतीकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनावणे यांच्या लढतीत सोनावणे यांनी ६ हजारांहून अधिक मताधिक्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. तरीही भाजप नेत्या पंकजा मुंडे खासदार बनणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक त्यांच्या पराभवामुळे निराश झाले आहे. काहींनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल देखील उचललं. त्यातच पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना केली असूनतसा प्रस्ताव देखील महाराष्ट्र भाजपने केंद्रीय नेतृत्वाला पाठवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...

निघोज नगरीत अवतरली पंढरी!, बाल वारकऱ्यांचा विठ्ठल नामाचा गजर

निघोज । नगर सहयाद्री आषाढी एकादशीचे औचित्य साधून महाराष्ट्रीय संस्कृतीचे जतन व दर्शन घडावे...

तारकपूर परिसरात घडलं भयंकर!,अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यु

अहिल्यानगर। नगर सहयाद्री शहरातील तारकपूर परिसरात शुक्रवारी (ता. 4) मध्यरात्री दुचाकीला ट्रकने धडक दिली. या...