spot_img
ब्रेकिंगपळशीचा मोस्ट 'वॉन्टेड' अडकला जाळ्यात! तीन साथीदारांसह 'ऐवढा' मुद्देमाल जप्त

पळशीचा मोस्ट ‘वॉन्टेड’ अडकला जाळ्यात! तीन साथीदारांसह ‘ऐवढा’ मुद्देमाल जप्त

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर तालुक्यातील गंभीर गुन्हे दाखल असलेला मोस्ट वॉन्टेड आरोपी तुकाराम ऊर्फ राजेंद्र बन्सी वारे ऊर्फ मधे ( वय २१ वर्षे, रा. माळवाडी पळशी ता. पारनेर ) याला साथीदार रोशन संपत रोकडे ( वय २३ वर्षे, रा. वडगांव सावताळ, ता. पारनेर ) दिपक मधुकर शिंदे ( वय २० रा. वडगांव सावताळ, ता. पारनेर ) प्रविण लक्ष्मण दुधावडे ( वय २१ वर्षे, रा. अकलापुर घारगांव ता. संगमनेर ) अटक केली आहे. या टोळीतून तीन लाख सत्तावीस हजार पाचशे रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले होते. तपासादरम्यान पोनि. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की, सराईत गुन्हेगार तुकाराम वारे हा त्याचे साथीदारांसह गावठी कट्टा, जिवंत काडतुस व सोन्याचे दागिने विक्री करणे करीता पारनेर फाटा येथे येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणीजावून पहाणी केली असता तीन इसम बोलताना दिसले. खात्री होताच संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडून कडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, सोन्याचे दागिने व एक मोटार सायकल असा तीन लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून बारकाईने विचारपुस केली असता वासुंदे शिवारात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी विरोधात नगर, पुणे, मंचर, राहुरी पोलिस ठाण्यात दरोडा, घरफोडी, जबरी चोरी अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी व सपोनि हेमंत थोरात, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संतोष खैरे, पोकों सागर ससाणे, मेघराज कोल्हे, मपोकॉ सोनाली साठे व चापोहेकॉ उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम ‘या’ दिवशी जाहीर होणार?

माय नगर वेब टीम Zilla Parishad Panchayat Samiti Election : येत्या २ डिसेंबर २०२५...

बीड पुन्हा हादरलं; ४ जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं

बीड / नगर सह्याद्री - बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, नेमकं काय केल?

नगर सह्याद्री वेब टीम Sonakshi Sinha : बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज अभिनय,...

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...