spot_img
अहमदनगरसंतापजनक! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन तरुणाकडून अत्याचार

संतापजनक! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन तरुणाकडून अत्याचार

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री-
तालुक्यातील खर्डा हद्दीतील मौजे नायगाव येथील अल्पवयीन मुलीवर बळजबरीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेऊन तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी  नायगाव येथील आरोपी राजेश बबन उगले, बाळासाहेब काशिनाथ लेंडे दोघे ( रा.नायगाव तालुका जामखेड) यांच्या विरोधात खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

पिडीतेच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादीची अल्पवयीन मुलगी (वय १४ वर्ष ९ महिने) जुन २०२३ मध्ये सायंकाळी ४ ३० वा. शाळा सुटल्यानंतर एकटीच पायी चालत घरी जात असतांना आरोपीने त्याचे राहते घरासमोर रस्त्यामध्ये अडवून तु माझे सोबत आमचे घरी चल नाहीतर तुला जिवच मारून टाकील तुझे शाळेत येणे जाणे बंद करून टाकील अशी धमकी देवून शारीरीक संबंध केले. त्यानंतर तु कोणाला काही सांगीतले तर तुला जिवच मारून टाकीन अशीही धमकी दिली.

त्यानंतर आरोपीने वेळोवेळी पिडीत मुलीला शाळेतुन घरी जात असताना बोलावून धमकी देवून आत्याचार केला. यातून पिडीत मुलगी गर्भवती राहिल्याने सदर प्रकरण उघडकीस आले. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास करत असताना यातील पिडीत मुलीने तिच्या जबाबात सांगीतले की, तिच्या राहत्या घरामध्ये एकटीच असातना गावातील बाळासाहेब काशिनाथ लेंडे यांनी देखील पाणी पिण्याचे बहाण्याने घरी येऊन धमकावत अत्याचार केला.

तसेच दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी बाळासाहेब लेंडे त्याचे शेतामध्ये ज्वारीचे कनसे काटत असताना पिडित मुलीवर ज्वारीमध्ये बळजबरीने शारीरीक संबंध केले असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पीडित मुलींच्या आईच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपीविरोधात खर्डा पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...