spot_img
अहमदनगर'कामोठेत रविवारी संवाद मेळाव्याचे आयोजन' खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रमुख...

‘कामोठेत रविवारी संवाद मेळाव्याचे आयोजन’ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच पारनेर तालुक्याचे युवा नेते विजूभाऊ औटी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे रविवार दि. ७ एप्रिल २०२४ रोजी कामोठे येथे महिला आणि युवक तसेच अहिल्यादेवीनगरकर परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यास खासदार डॉ. सुजय विखे पाटील व प्रशांतदादा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व अन्य विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. कामोठे येथील सेक्टर-११ मधील पोलीस स्टेशनच्या समोरील नालंदा बुद्धविहार मैदानावर हा मेळावा होणार आहे.

या मेळाव्यात रविवारी सायंकाळी ०५ ते रात्री ०८ या वेळेत प्रसिद्ध गायक परमेश माळी प्रस्तुत ऑर्केस्ट्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ०६ ते ०७ या दरम्यान शाही मिरवणूक निघणार आहे. यात हत्ती, घोडे, उंट, झांज पथक, हलगी यांचा समावेश असणार आहे.

सायंकाळी ०७ ते रात्री ०९ मान्यवरांचे मनोगत होणार आहे. रात्री ०९ ते १० स्नेहभोजन असणार आहे. विजूभाऊ औटी मित्र परिवार, कामोठे रहिवासी सांस्कृतिक युवा मित्रमंडळ व संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन यांनी हा मेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कुंडलिक वाफारे, संजय आहेर, दिलीप घुले,सभाजी जऱ्हाड, कृष्णा शेठ ढोमे, संतोष चौगुले, सागर गोळे, शेखर काशीद, सचिन वाफरे, राहुल लांडगे, वैभव शेळके, प्रथमेश पुंडे, राहुल शिर्के, जनार्दन उंडे, अमोल डोंगरे, शुभम वाफारे, अक्षय मगर, गणेश गुंड, पप्पू गायखे, गोरख मेहेर, दादू शिर्के, समर नवले, माऊली तांबोळी यांनी केले आहे.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...

उन्हापासून दिलासा मिळणार, पाऊस हजेरी लावणार! जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान..

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....