Politics News: विधानसभेचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणुकीच्या पाश्वभुमीवर सर्वच नेते मंडळींनी कंबर कसली आहे. कार्यक्रमांसह मेळाव्याचा देखील जोर वाढला आहे. अशा एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांनी लाडकी बहिण योजनेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला.
राहुरी तालुक्यात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी यांनी आदिशक्तीचा जागर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शेरो शायरी करत महायुती सरकारचा समाचार घेतला.
खा. अमोल कोल्हे म्हणाले, आपली बहीण आधीपासूनच लाडकी, म्हणून लोकसभेला मतांची झाली कडकी. भाऊ कधी ओवाळणी टाकल्यावर बहिणींना विचारात नाही पैसे आले का? आले का?…मुख्यमंत्री मात्र विचारत होते.पैसे आले का? बहिणी म्हणतात खिशातून दिले का? बहिण लाडकी हे चांगलच, पण दाजींच्या सोयाबीन, दुधाला भाव द्या अशी मागणी करत अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
पुढे बोलतांना खा. कोल्हे म्हणाले, चाय पे शुरु हुई सरकार… गाय पे आकर अटक गयी…बात तो 15 लाख की हुईं थी…पंधरासौ मे कैसे सिमट गयी? दादा, भाई, भाऊ.. ये गुलाबी धुल हमारी आंखो मे ना झोके…आपको गद्दारी के भी 50 खोके…अशी शेरो शायरी करत खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.