spot_img
अहमदनगरAhmednagar: कांदा निर्यात बंदी! खासदार विखे पाटील केंद्रीय मंत्री शाह यांच्याशी चर्चा...

Ahmednagar: कांदा निर्यात बंदी! खासदार विखे पाटील केंद्रीय मंत्री शाह यांच्याशी चर्चा करणार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींसह दिल्ली येथे अमित शाह यांना मी भेटणार आहेत. कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यासाबाबत चर्चा करणार आहे.

कांद्याचा भाव स्थिर होण्यासाठी एक मासिक कोटा निश्चित करून कांद्याला हमी भाव मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे खा.डॉ.सुजय विखे यांनी स्पष्ट केले. नगर तालुयातील उदरमल येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, राजेंद्र तोरडमल, देविदास आव्हाड आदी उपस्थित होते.

कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून याचा मोठा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. यातून शेतकर्‍यांना दिलासा मिळावा यासाठी ही भेट घेतली जाणार आहे. निश्चितच शेतकरी हिताचा विचार केला जाईल असे खा. सुजय विखेंनी यावेळी स्पष्ट केले. त्यांनी महाविकास आघाडीवरही घणाघात केला.

ते म्हणाले, मागील दीड वर्षाच्या काळात महायुतीचे सरकार नव्हते तेव्हा मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता भासत होती. परंतु आता महायुतीचे सरकार आल्यापासून अहमदनगर जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडत नाही. यापुढेही विविध विकासकामांना प्राधान्य देऊन भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पे अँड पार्कवरुन वादावादी!; किरण काळे म्हणाले, मागे घ्या, अन्यथा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शुक्रवारी सकाळची वेळ. सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे...

आमदार जगताप यांचा शहरात सत्कार; म्हणाले, हिरवी वळवळ थांबवायची असेल तर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा...

१०४ ग्रॅम सोन्यावर डल्ला; प्रोफेसर चौकातील प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सोन्याचे दागिने तयार व दुरूस्ती करण्यासाठी दिलेले आठ लाख 30 हजाराचे...

भीषण स्फोटाने भंडारा हादरलं! ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट भंडारा | नगर सह्याद्री:- भंडाऱ्यामध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची...