spot_img
अहमदनगरAhmednagar: दुकानदाराच्या मारहाणीत एकाचा मृत्यू! मार्केट यार्डच्या आवारात नेमकं घडलं काय..

Ahmednagar: दुकानदाराच्या मारहाणीत एकाचा मृत्यू! मार्केट यार्डच्या आवारात नेमकं घडलं काय..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
शहरातील मार्केट यार्डच्या आवारात दुकानदाराच्या मारहाणीत एका वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात वृध्द व्यक्तीच्या जखमी बहिणींच्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत असलेल्या वृध्द महिला व तिच्या वृध्द भावाला तेथून हुसकावून लावण्यासाठी तिघांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. ९) रात्री घडली. कुसुम कुंभारे व त्यांचा भाऊ बाळू नागपुरे हे मार्केट यार्डमध्ये बसलेले असताना त्यांच्या बाजूला असलेल्या दुकानाचे मालक व दोन अनोळखी व्यक्तींनी तुम्ही येथे रहायचे नाही, तुम्ही निघून जा, असे म्हणत दोघांना मारहाण केली.

यात कुसुम हरिभाऊ कुंभारे (वय ६५, मूळ रा. भिंगार) ही वृध्द महिला जखमी असून तिचा भाऊ बाळू विठोबा नागपुरे (वय ६०) यांचा काल, रविवारी सकाळी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका संशयिताचा शोध सुरू आहे. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून डीव्हीआर जप्त करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...