मुंबई / नगर सह्याद्री : सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. काही आमदार खासदारांनी राजीनामे दिलेत. आता उद्धव ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, राज्यात ६-७ केंद्रीय मंत्री आहेत.
सध्या महाराष्ट्र जाळत आहेत, जर त्यांनी सर्वसमावेशक आरक्षण दिले नाही तर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात राजीनामा द्यावा. तरी हा प्रश्न सोडवला नाही तर राज्यातील ४८ खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा. ही हुकूमशाही मोडून काढण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने मराठा-धनगर समाजाला आरक्षण द्यावे. उर्वरित मुद्दे बाजूला ठेवून आरक्षणाचा मुद्दा पंतप्रधानांसमोर मांडण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांना केले आहे.
कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकारने मराठा धनगर समाजाला आरक्षण द्यावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हे प्रकरण केंद्र सरकारच्या हातात आहे. विशेष अधिवेशन घेऊन प्रश्न सुटला तर नक्की घ्या, पण केंद्राने संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा. सध्या ज्यांना ३१ डिसेंबरनंतर अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे ज्यांना कळले आहे, ते राजीनामे देत आहेत.
केंद्रीय मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत राज्यातील मराठा आरक्षणाचा विषय मांडला पाहिजे असं त्यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षणाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते. एक प्रचाराला दुसऱ्या राज्यात गेले, तर दुसरे डेंग्युने आजारी पडलेत. जरांगे पाटलांनी कृपा करून टोकाचे पाऊल उचलू नका.
तुमच्यासारख्या लढवय्यांची राज्याला गरज आहे. आपापसात कुठेही मतभेद, जाळपोळ होईल असं करू नका. जाळपोळ करणारे दुसरे कोण असतील तर हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. जेणेकरून राज्यात नवीन उद्योग येऊ नये. महाराष्ट्रात आज अस्वस्थता आहे. मराठ्यांना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.