spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग ! मराठा आरक्षणासाठी 'येथील' तरुणाने आत्महत्या करत संपवले जीवन

अहमदनगर ब्रेकिंग ! मराठा आरक्षणासाठी ‘येथील’ तरुणाने आत्महत्या करत संपवले जीवन

spot_img

संगमनेर / नगर सह्याद्री : संगमनेर तालुक्यातील झोळे येथील तरूणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. मंगळवारी दि.(३१) ऑक्टोबर रोजी पहाटे ही घटना घडली. एक मराठा लाख मराठा असा उल्लेख चिठ्ठीत करत त्याने गळफास घेतला.

सागर भाऊसाहेब वाळे वय (२५) असे मृत युवकाचे नाव आहे. समजलेली माहिती अशी : सागर वाळे हा युवक संगमनेर येथे कार्यरत आहे. सोमवारी रात्री घरातील सर्व झोपल्यानंतर मंगळवारी पहाटे सागर घराच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्ये गेला. तेथे त्याने गळफास घेतला.

त्याठिकाणी एक वही सापडली आहे. त्यात ”आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये,. एक मराठा लाख मराठा, आपला लाडका सागर मराठा” असे उल्लेख केलेला आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली.

नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणाचा मृतदेह खाली घेतला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर ब्रेकिंग ! गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर हल्ला, माळीवाड्यात पोलिसांचा फौजफाटा

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगरच्या बालिकाश्रम रोड परिसरात काही दिवसांपूर्वी ओंकार उर्फ...

Ahmednagar: शहरासह जिल्ह्यात जोर ‘धार’

रस्त्यांवर अर्धाफुट पाणी; नगरकरांची अक्षरश: त्रेधातिरपीट अहमदनगर | नगर सह्याद्री मागील रविवारपासून अवकाळीचा तडाखा जिल्ह्याला बसत...

Ahmednagar: पत्र आले आमदारांचे, ‘माफी’ सूचली प्रशासनाला

शास्तीच्या रकमेत सवलत देण्याची परंपरा कायम ः आता प्रतिसादाकडे लक्ष अहमदनगर | नगर सह्याद्री आमदारांनी पत्र...

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...