spot_img
मनोरंजनघटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक थेट अंगठी दाखवत म्हणाला, लग्न…

घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक थेट अंगठी दाखवत म्हणाला, लग्न…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी मीडिया आणि सोशल मीडियावर खळबळ उडवली होती. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या संबंधांमध्ये तणाव आहे असा दावा देखील केला जात होता, मात्र चर्चांना अभिषेक बच्चनने पूर्णविराम दिला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने स्वत: अंगठी दाखवत सांगितले की “आम्ही अजूनही एकमेकांसोबत आहोत. आमच्या घटस्फोटाच्या चर्चा विनाकारण माध्यमांमध्ये केल्या जात आहे. मला याविषयी काहीही बोलायचे नाही.

या सर्व गोष्टी प्रमाणाबाहेर विचित्र पद्धतीने सांगितल्या जात असल्यामुळे हे खूप वाईट आहे. तुम्ही हे का करत आहेत ? हे सुद्धा मला कळतंय. तुम्हालाही बातम्या कराव्या लागतात, पण ठिक आहे. त्यातल्या त्यात आम्ही सेलिब्रिटी आहोत, तर आम्हाला यासर्व गोष्टींना सामोरं जावं लागतंच.” असे सांगीतले आहे.

अनंत अंबानीच्या लग्नात अभिषेक बच्चन, जया बच्चन, अमिताभ बच्चन, श्वेता नंदा एकत्र आले होते, तर ऐश्वर्या आणि तिची मुलगी वेगळी आली होती. तेव्हापासूनच या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुरूवात झाली होती. २००७ मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांचे थाटामाटामध्ये विवाहसोहळा पार पडला. यानंतर २०११ मध्ये या जोडप्याने लेक आराध्याला जन्म दिला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...