spot_img
ब्रेकिंगबापरे! छगन भुजबळांना धमकी, १ कोटींची मागणी, 'या' आरोपीला बेड्या

बापरे! छगन भुजबळांना धमकी, १ कोटींची मागणी, ‘या’ आरोपीला बेड्या

spot_img

नाशिक / नगर सह्याद्री –
नाशिकमधून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आलीये. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना धमकी देत १ कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली. छगन भुजबळ यांना फोन करून आरोपीने खंडणीची मागणी केली. भुजबळ यांच्या फोनवर त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड आणि संशयित आरोपीमध्ये संवाद झाला होता. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आरोपीला सापळा रचत अटक केली.

छगन भुजबळांच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर आयकर विभागाची धाड पडणार असून त्या पथकात मी असून धाडीत मी सहकार्य करेल अशी आरोपीने बतावणी केली होती. आयकर विभागाच्या धाडीत मदत करण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. छगन भुजबळांकडे खंडणी मागितल्यामुळे खळबळ उडाली. यानंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ कुठून फोन आला आणि कुणी केला याचा तपास सुरू केला. अवघ्या काही तासांत त्यांनी आरोपीचा शोध घेतला.

छगन भुजबळ यांना फोन करून खंडणी मागणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांनी सापळा रचत अटक केली. संशयित आरोपीने गुजरातच्या धरमपूर इथे पैसे घेऊन बोलावले होते. मात्र तिथं हुलकावणी देत पेठ तालुक्यातील करंजाळी गावात पैसे घेण्यासाठी बोलावले. राहुल भुसारे या उच्चशिक्षित तरुणाने खंडणीची मागणी केली होती. संशयित आरोपी पेठ तालुक्यातील करंजाळी गावातील रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अज्ञात वाहनाने बाप-लेकाला उडवले! ‘या’ रोडवर भीषण अपघात..

पाथर्डी | नगर सहयाद्री पाथर्डी-शेवगाव रोडवरील महावितरणच्या गेटजवळ सोमवारी सकाळी सव्वा सात वाजता मॉर्निंग...

१५०० रुपये कायमचे बंद? लाडकी बहीण योजनेतील १० लाख महिलांचे अर्ज बाद! यादीत तुमचेही नाव नाही ना?

मुंबई | नगर सहयाद्री राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी...

अहिल्यानगरमध्ये खळबळ! ठाकरे गटाच्या ‘बड्या’ नेत्याला अटक, कार्यालयातच केला महिलेवर अत्याचार..

संपर्क कार्यालयातच महिलेवर अत्याचार; शहरप्रमुख किरण काळे यांना अटक अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगरमधून एक खळबळजनक...

आजचे राशी भविष्य! आषाढ महिन्यातील मंगळवार ‘या’ राशींना ठरणार लाभदायक

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह...