spot_img
ब्रेकिंगबापरे! महावितरणच्या कर्मचार्‍यांवर हल्ला; मध्यरात्री केडगावमध्ये नेमकं काय घडलं?

बापरे! महावितरणच्या कर्मचार्‍यांवर हल्ला; मध्यरात्री केडगावमध्ये नेमकं काय घडलं?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नेप्ती रस्ता, केडगाव येथील म्हसोबा मंदिराजवळ मध्यरात्री विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या सहायक अभियंत्यांसह त्यांच्या कर्मचार्‍यांवर तिघांनी अचानक हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला असून, अभियंत्यांच्या खिशातील दोन हजार रूपये जबरदस्तीने हिसकावण्यात आले आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी (30 मे) सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सहायक अभियंता राहुल सिताराम शिलावंत (वय 35, रा. शाहूनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

सागर म्हस्के (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) व त्याच्या दोन साथीदारांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 मे रोजी मध्यरात्री 12.45 वा. सुमारास केडगाव भागातील भूषणनगर येथे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शिलावंत यांनी वरिष्ठ तंत्रज्ञ योगेश बेरड आणि बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ शंकर परभणे यांना रात्रीच्या शिफ्टमध्ये फॉल्ट शोधण्याचे आदेश दिले. पहाटे 3.15 वा. सुमारास शिलावंत स्वतः घटनास्थळी दाखल झाले.

फॉल्ट शोधत असताना सागर म्हस्के त्यांच्या जवळ आला व तुम्ही एमएसईबीचे कर्मचारी आहात का? फोन का उचलत नाही? लाईट का गेली? असे विचारून शिवीगाळ व दमदाटी करू लागला. शिलावंत यांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांच्याशी झटापट करत त्यांच्या शर्टच्या खिशातील दोन हजार रूपये काढून घेतले व खिशात ठेवले. यानंतर त्याने शिलावंत यांना जबरदस्तीने धक्काबुक्की केली.

हे पाहून योगेश बेरड आणि शंकर परभणे यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु सागर म्हस्के याने लगेचच फोनवरून आपल्या दोन अनोळखी साथीदारांना बोलावून घेतले. दरम्यान, परिस्थिती गंभीर होत असल्याने शिलावंत यांनी घटनास्थळी आपली दुचाकी सोडून परभणे यांच्या दुचाकीवरून तेथून निघून गेले.

बेरड यांनीही आपली दुचाकी घटनास्थळी सोडून पळ काढला. यानंतर सागर म्हस्के व त्याचे दोन साथीदारांनी रंगोली चौकाजवळ शंकर परभणे यांना अडवून दगडाने मारहाण केली. शिलावंत यांनी पुढे वरिष्ठ अधिकारी व सहकार्‍यांना कळवून कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर, पण कोट्यवधी कमावले! गुजरात टायटन्सलाही लागली लॉटरी

नगर सह्याद्री वेब टीम मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये क्वालिफायर २ मधून...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाकडून सरकारला….

राज्य निवडणूक आयोगाच्या प्रभाग रचनेबाबत सुचना मुंबई | नगर सह्याद्री राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद,...

अहिल्यानगर जिल्हा गोळीबाराने हादरला; भीमराज आव्हाडांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना आणि हिंसाचाराच्या घटना घडत...

नगर शहर हादरलं! युवकांवर गोळीबार; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना आणि हिंसाचाराच्या घटना घडत...