मुंबई। नगर सहयाद्री
सुपरस्टार नाना पाटेकर यांचे असंख्य चाहते आहेत. अनेक सिनेमांमधील दमदार भूमिका साकारणारे नाना पाटेकर हे आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. ते केवळ सिनेमाचं नव्हे तर त्यांच्या वक्तव्याने देखील प्रसिद्ध आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर अभिनेते नाना पाटेकर यांना अनेक पक्षाकडून ऑफर देण्यात आल्याची चर्चा रंगली होती.
‘आगामी निवडणुकीत भाजपला 350-375 जागा मिळतील आणि पुन्हा भाजप सत्तेत येईल. भाजप देशात उत्तम काम करत आहे. त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप पक्षाला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील.. देशाकडे भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही.’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी नाना पाटेकर यांचे भाकीत देखील चर्चेत आहे.
मागील दिवसांपासून नाना पाटेकर निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. दरम्यान आज मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर नाना पाटेक आणि मकरंद अनासपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पाटेकर यांनी आपली राजकारणातील प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केली. नाना पाटेकर म्हणाले, मला ऑफर असली तरी मी ही ऑफर स्वीकारणार नसून राजकारण हा आपला प्रांत नसल्याचे म्हटले आहे.