spot_img
महाराष्ट्रआता धनगर व मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे लढणार !

आता धनगर व मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे लढणार !

spot_img

रायगड / नगर सह्याद्री : महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. त्याला बहुतांशी यश आले आहे. सध्या मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरु आहे.मराठा समाज मागास आहे, हे सरकारने सिद्ध कराव.

ती सरकारची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील आज रागयडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच दर्शन घेणार आहेत. रायगडावर आल्यानंतर विजय प्राप्त होतो, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

तसेच ते म्हणाले, मराठ्यांचा विजय झालाय पण नव्या कायद्यानुसार पहिल प्रमाणपत्र मिळालं की, महादिवाळी साजरी करु, गुलाल उधळू असं जरांगे पाटील म्हणालेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आणखी दोन समाजांसाठी आरक्षणाचा लढा लढण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. मराठ्यांना आरक्षण मिळाली की, धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही तेच बघतो असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“मराठ्यांच्या आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा आहे. ते झाल्यानंतर धनगर आणि मुस्लिमांना सरकार आरक्षण कस देत नाही तेच बघतो? असं जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणाच्या बाजूचे नाहीत. ते सत्याच्या बाजूने उभे राहणार. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे सहाजिकच त्यांना साथ द्यावी लागेल. माझ कोणाबरोबरही राजकीय वैर नाही. मी मुंबईवरुन परत आलो, त्याचवेळी सगळ्या गोष्टी तिथे सोडून आलो असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...