spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी : ED कडून चौकशीच्या धास्तीने मुख्यमंत्री बेपत्ता

मोठी बातमी : ED कडून चौकशीच्या धास्तीने मुख्यमंत्री बेपत्ता

spot_img

नवी दिल्ली / नगर सह्याद्री : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून अनेक नेते, उद्योगपतींची चौकशी सुरु आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरण, आर्थिक अनियमितता यामुळे ईडी सध्या अनेकांची चौकशी करत आहेत. दरम्यान सध्या झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडी चौकशी सुरु आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची भीती असल्यामुळे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता झाले आहेत.

जमीन घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रींगमध्ये सोरेन अडकले आहेत. ईडीकडून सोमवारी सोरेन यांच्या दिल्ली येथील शांती निकेतन येथील घरासह 3 ठिकाणी छापे मारले. सकाळी 7 वाजेपासून सुरु असलेली ही कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरु होती. परंतु ईडीच्या टीमला सोरेन मिळाले नाही. यामुळे ईडीने त्यांची BMW जप्त केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन मिळत नसल्यामुळे ईडीने विमानतळावर अलर्ट जारी केला आहे.

झारखंडमध्ये हालचालींना वेग
दिल्लीत ईडीची कारवाई मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर सुरु असताना झारखंडमध्ये हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार रांचीमध्ये दाखल होत आहे. काँग्रेस आमदार आणि मंत्री मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहचले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्याची तयारी सुरु असल्याचा आरोप भाजप नेते आणि खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...