बारामती / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक ट्विस्ट येत आहेत. पवार कुटुंबात उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. आता शरद पवार यांनी थेट अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जात आहे. लोक सत्य काय आहेत ते जाणून आहेत. जनता आमच्यासोबत आहे. भावनिक आवाहन करण्याची आम्हाला गरज नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. बारामतीचा मतदार सुज्ञ असून तो योग्य निर्णय घेईल असेही शरद पवारांनी म्हटले आहे.
सगळ्या देशाला माहित आहे की, राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कुणी केली. तरी सुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणे हा अन्याय आहे. आयोगाचा निर्णय अन्यायकारक आहे. विधानसभा अध्यक्ष वेगळा निर्णय देणार नाही, याची खात्री होती. शिवसेनेसोबतही त्यांनी असाच निर्णय घेतला, आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मी अनेक निवडणूक अनेक चिन्हवर लढलो. एखाद्याच्या वाटत असेल की एखाद्याची चिन्ह काढून घेतली तर त्याचं अस्तित्व काढून घेऊ तर तसे होत नसतं. नवीन चिन्ह आपल्याला मिळेल, ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पक्ष आणि चिन्हाबद्दल निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला, असा आरोप देखील शरद पवार यांनी केला आहे. आपल्यावर अन्याय होणारे निर्णय होतील. पक्षाला पुढची तयारी केली पाहिजे, त्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात गेल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.