spot_img
अहमदनगरAhmednagar News : अवैध धंद्यांवर एमआयडीसी पोलिसांची दिवसभर छापेमारी ! चौघांवर...

Ahmednagar News : अवैध धंद्यांवर एमआयडीसी पोलिसांची दिवसभर छापेमारी ! चौघांवर गुन्हा

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुरु असणाऱ्या विनापरवाना दारू विक्री, मटका आदी अवैध धंद्यांवर पोलिसांनी छापेमारी केली. दिवसभर ही मोहीम सुरु होती. पोलिसांनी या कारवाईत चौघांवर गुन्हा नोंदवत हजारोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अधिक माहिती अशी : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी (दि.१६ फेब्रुवारी) दिवसभर एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांवर धडक कारवाई केली. या मोहिमेत गावठी तसेच देशी विदेशी दारू विक्री करणारे, मटका घेणारे अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत अकिल पापाभाई शेख (वय ३७, रा.एमआयडीसी) याच्या ताब्यात ३ हजार २०० रुपयांची ३२ लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. नागापूर परिसरामध्ये विशाल उर्फ डल्ली विष्णू शिंदे (रा.नागापूर) हा सार्वजनिक ठिकाणी संशयितरित्या फिरताना आढळून आल्याने पोलीस पथकाने त्याची झडती घेतली असता त्याजवळ ९८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १४ कॉटर, ९०० रुपये किमतीच्या मॅकडॉल व्हिस्कीच्या ६ कॉटर, ८०० रुपये किमतीच्या इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या ५ कॉटर, ३ हजार रुपये किमतीची ३० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा ५ हजार ६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तिसऱ्या कारवाईत दीपक मनोहर शेखटकर (रा.एमआयडीसी) हा एका टपरीच्या आडोशाला संशयितरित्या मिळून आल्याने त्याची झडती घेतली असता त्याकडे ३ हजार रुपये किमतीची ३० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू मिळून आल्याने ती जप्त करून त्याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांनी गुन्हा दाखल केला. रेणुकानगर बोल्हेगाव येथे सुभाष वामन थोरात (वय ४५) हा विना परवाना कल्याण मटका खेळताना व खेळविताना मिळून आला. एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या ताब्यात १ हजार २० रुपये व कल्याण मटका खेळण्याचे साहित्य जप्त करत महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे पोलीस हेडकॉन्स्टेबल बंडू भागवत यांनी गुन्हा दाखल केला.

अशा एकूण ४ कारवायांमध्ये १२ हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस निरीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले आदींच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदकुमार सांगळे, राजेंद्र सुद्रिक, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, महेश बोरुडे, बंडू भागवत आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘हुजूर मराठे आ रहे हे’! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला मुंबईकडे कूच करणार

बीड । नगर सहयाद्री  येत्या 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसऱ्या दिवशी...

…हेच माझे राजकारणातील ‘गुरु’!, माजी खासदार सुजय विखे पाटलांचे वक्तव्य चर्चेत

अहिल्यानगर । नगर सहयाद्री गुरुपौर्णिमेनिमित्त माजी खासदार व भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शिर्डी...

नगर शहरातील मावा कारखान्यांवर रेड; पोलीस धडकताच घडलं असं काही..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शुक्रवार दि. 11 जुलै शहरातील नीलक्रांती चौक आणि दिल्लीगेट परिसरात...

अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ! हत्या की आत्महत्या? पती-पत्नीचा ‘तसल्या’ अवस्थेत आढळला मृतदेह..

राहाता । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...