spot_img
महाराष्ट्रबोलत नाही, याचा अर्थ... भुजबळांच्या संभाजीनगर दौऱ्यानंतर जरांगे पाटील म्हणाले..

बोलत नाही, याचा अर्थ… भुजबळांच्या संभाजीनगर दौऱ्यानंतर जरांगे पाटील म्हणाले..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
मराठा आरक्षणाची मागणी सोडविण्यासाठी राज्य सरकारने आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आणखी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. त्यानुसार जरांगे यांनी सरकारला उपोषण मागे घेतल्यानंतर अल्टिमेटमही दिला आहे.

तर दुसरीकडे मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले असून ओबीसी समाजाचे नेते आक्रमक होत आहेत. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे पाटील यांनीही छत्रपती संभाजीनगर भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. समानता निर्माण करण्यासाठी आहे. ७० वर्षांच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाले असून अजूनही समाज मागासच आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण सरसकट ओबीसीतून नको, तर स्वतंत्र आरक्षण द्या, असा एल्गार ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. ते आज सकाळी छत्रपती संभाजीनगरहून -बीडकडे जात असताना अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या महामार्गावरील वडीगोद्री येथे बोलत होते.

यानंतर मनोज जरांगे यांना विचारले असता भुजबळांना भेटण्याचा काही संबंध नाही. पण, मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी बोलणार नाही. आरक्षणावर कोणी बोलत असेल तर मी सोडणार नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

१७ नोव्हेंबरला ओबीसींचा मोर्चा
मंत्री छगन भुजबळ यांनी दोदडगाव येथील मंडल स्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर वडीगोद्री येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, १७ तारखेला जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसीच्या महामोर्चाचे आयोजन केले असून सर्वांनी एकत्र यावे. निमंत्रणाची वाट न पाहता मोर्चाला या. सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन उपोषण, मोर्चे काढून एका आवाजात उभे राहावे लागेल. नाहीतर आपल्या लेकरा-बाळांचे भवितव्य धोक्यात येईल, असेही भुजबळ यांनी म्हटले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्वत:ला आलमगीर म्हणणाऱ्याची कबर…; अमित शाह रायगडावरुन गरजले!

रायगड । नगर सहयाद्री:- शिवराय हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखंड भारताचे प्रेरणास्थान आहेत, असे ठाम...

चिमुकल्याच्या अंगावर उकळते तेल फेकले! नगर शहरात धक्कादायक प्रकार, कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- बापासह सात वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर उकळते तेल टाकून जखमी केल्याची...

सावधान! पुढील 48 तासात ‘या’ भागात कोसळणार गारा?

Weather Update: एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात प्रचंड उष्णतेचा कहर जाणवत आहे. काही भागांमध्ये तापमान...

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर! बोर्डाने घेतला मोठा निर्णय, कामाची बातमी..

Maharashtra Board: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) जुलै-ऑगस्ट २०२५...