spot_img
राजकारण'इंडिया' आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा नितीश कुमार? पहा..

‘इंडिया’ आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा नितीश कुमार? पहा..

spot_img

पाटणा / नगरसह्याद्री : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येत इंडिया आघाडी स्थापन केली. पाटणा, बंगळुरू आणि मुंबई येथे बैठका पार पडल्यानंतर आज चौथी बैठक नवी दिल्ली येथे होणार आहे.

मात्र या बैठकीआधी बिहारची राजधानी असलेल्या पाटणा इथं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समर्थकांनी लावलेल्या पोस्टर्सची चर्चा होऊ लागली आहे. पाटण्यात लावलेल्या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे की, “जर खरंच विजय हवा असेल तर एक निश्चय पाहिजे,

एक नितीश पाहिजे.” या पोस्टरच्या माध्यातून नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचा चेहरा घोषित करण्याची मागणी सध्या होताना दिसत आहे. त्यामुळे आता आजच्या बैठकीत इंडिया आघाडीचा चेहरा ठरवण्याबाबत काही चर्चा होते का हे पाहणं गरजेचे आहे.

दरम्यान, नितीश कुमार यांच्या पुढाकारानेच विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर बंगळुरू येथील दुसऱ्या बैठकीत या आघाडीचं इंडिया असं नामकरण झालं होत. आज इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत जागावाटपासह संयुक्त निवडणूक कॅम्पेनची घोषणा होऊ शकते. तसंच सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी कॉमन अजेंड्यावर चर्चा करून त्याबाबतचा निर्णयाबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...