spot_img
अहमदनगरAhmadgarh politics: नीलेश लंकेंचे ठरलं; विखेंच्या विरोधात रणशिंग फुंकलं!

Ahmadgarh politics: नीलेश लंकेंचे ठरलं; विखेंच्या विरोधात रणशिंग फुंकलं!

spot_img

राज्यात महायुतीसोबत अन् नगरमध्ये विरोधी पक्षातील उबाठा सेनेसोबतच्या बैठकांमधून थेट विखे पिता- पुत्रांवर हल्लाबोल

अहमदनगर | नगर सह्याद्री

राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये असलेल्या आ. नीलेश लंके यांना लोकसभेचे लागलेले वेध आता लपून राहिले नाहीत! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार जागांवर लढणार असल्याचे जाहीर करताना नगरच्या जागेबाबत काहीही भाष्य केले नाही. याचा अर्थ ही जागा भाजप लढवणार हे नक्की! मात्र, असे असताना पारनेरचे आ. नीलेश लंके यांना लोकसभेचे अनेक वर्षांपासून लागलेले वेध अद्यापही कायम आहेत.

संधी मिळेल तिथे विखे पिता-पुत्रांवर निशाणा साधणार्‍या आ. लंके यांनी नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात विखेंवर जहरी टिकास्त्र सोडले. व्यासपीठावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी होते. त्यांच्याच साक्षीने आ. लंके यांनी विखेंवर थेट हल्लाबोल केला. राज्याच्या सत्तेत एकत्र असतानाही आ. लंके सातत्याने विखेंच्या विरोधात बोलत आले आहेत. अशातच आता गेल्या पंधरा दिवसात आ. लंके हे विखे यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहेत. दक्षिणेतील दौर्‍यांमध्येही त्यांनी वाढ केल्याचे दिसते! याचाच अर्थ आ. लंके हे लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असणार हे नक्की!

नगर तालुक्यातील विकास कामांच्या शुभारंभाच्या निमित्ताने आ. लंके यांनी विखे पिता-पुत्रांचा नामोल्लेख टाळत जहरी टिका केली. जिल्हा परिषदेच्या कामांचे विखे श्रेय घेत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्याचे नेते म्हणविणारे मंत्री आहेत आणि असे असताना न केलेल्या कामांचे श्रेय ते घेत असल्याचा मुद्या त्यांनी मांडला. यावेळी त्यांच्यासोबत महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी नव्हता! व्यासपीठावर होते ते शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ!

राज्यातील सरकारच्या माध्यमातून केलेली कामे अधिकारी-कर्मचारी जनतेला सांगत असताना त्यालाही आ. लंके यांनी आक्षेप घेतला. प्रशासनाला धाक दाखवायचा आणि दडपशाहीने प्रशासनातील लोकांना सरकारची कामगीरी सांगण्यास भाग पाडले जात असल्याचा आक्षेपही त्यांनी नोंदवला. विखे हे दुसर्‍याच्या झेंड्यावर पंढरपूरची स्वप्ने पाहत असल्याची टीकाही त्यांनी केली. वास्तविक पाहता जिल्हा परिषदेला निधी राज्य आणि केंद्र सरकारचाच येतो. त्याच निधीतील कामे जिल्हा परिषदेमार्फत होत असताना त्यात सत्ताधारी म्हणून विखेंचे श्रेय आलेच! आ. लंके हे देखील
राज्याच्या सत्तेत अजित पवार यांच्यामुळे आहेतच! मात्र, असे असतानाही आ. लंके यांनी या निधीशी विखेंचा काहीच संबंध नसल्याचे जाहीरपणे सांगितले.

सोडचार वर्षात केेलेल्या कामांच्या मुद्यावर खा. सुजय विखे हे मतदारसंघात सभा-बैठका घेत आहेत. त्याचा समाचार घेताना आ. लंके यांनी साडेचार वर्षात तुम्ही केलेल्या कामांचा कागदोपत्री लेखाजोखा घेऊन समोरासमोर बसण्याचे आव्हान दिले. जिल्हा परिषदेचा आणि विखेंचा काहीही संबंध नसल्याचा घणाघातही त्यांनी केला. वास्तविक पालकमंत्री म्हणून विखेंचा जिल्हा परिषदेशी थेट संबंध असतानाही आ. लंके यांनी विखेंना थेटपणे ललकारले. आ. लंके यांचे हेच आक्रमकपणे बोलणे आता लोकसभेचे वेध लागल्याचे मानले जाते. तुमच्या घराकडे जाणारा रस्ता (मनमाड रोड) आधी नीट करा हे जाहीरपणे सांगणार्‍या लंके यांनी या मुद्यावर देखील कुरापत काढलीच!

लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना आ. लंके यांचे आक्रमक होणे आणि त्यातही विखे यांच्यावर संधी मिळेल तिथे टिकास्त्र सोडणे जोरात सुरु आहे. राज्यात अजित पवार यांच्यासोबत असतानाही त्यांच्याकडून लोकसभा निवडणुकीची सुरू असलेली तयारी सध्या चर्चेत आहे. विखेंच्या विरोधात लंके यांनी रणशिंग फुंकले असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळेच विखेंचे विरोधक लंके यांना बोलावताना दिसत आहेत. त्यात अग्रभागी आहेत ते शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते! एकूणच संधी मिळेल तिथे कुरापत काढणार्‍या आ. लंके यांच्या आक्रमक होण्यामागे लोकसभा उमेदवारी लपून राहिलेली नाही.

विकास कामांचं श्रेय नक्की कोणाचे?

महायुतीमुळे कामे मार्गी लागली- अजित पवार

महाविकास आघाडीमुळेच कामे- नीलेश लंके

पुणेवाडी (पारनेर) वीज उपकेंद्राचा शुभारंभ काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्या कामाचे श्रेय विखे पाटलांचे नसून ते काम तत्कालीन उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यामुळे मार्गी लागले, असा दावा लंके यांनी केला. भाजपसोबत सत्तेत असलेल्या आ. लंके यांनी या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील अंगावर घेतले. महायुतीच्या ट्रीपल इंजिन सरकारमुळे कामे मार्गी लागली असल्याचे अजित पवार सांगत असताना त्यांचेच समर्थक असणारे आ. लंके यांनी शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरे यांना कामाचे श्रेय दिले! अजित पवार यांच्या सोबत असतानाही आ. लंके व त्यांच्या समर्थकांनी कामांचे श्रेय देण्याच्या मुद्यावर थेटपणे शरद पवार-उद्धव ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीला श्रेय दिल्याने आ. लंके व त्यांचे समर्थक आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपले असल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....