spot_img
अहमदनगरनगरमधील शरद पवार गटाच्या बैठकीला आ. निलेश लंके यांची उपस्थिती ! पक्षप्रवेशाच्या...

नगरमधील शरद पवार गटाच्या बैठकीला आ. निलेश लंके यांची उपस्थिती ! पक्षप्रवेशाच्या चर्चांना बळ

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : अहमदनगर मधील राष्ट्रवादी भवन मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीला आ. निलेश लंके हे उपस्थित होते. त्यामुळे आता आ. निलेश यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला पुष्टी मिळाली असल्याची चर्चा आहे.

अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाची आज (दि.२३ मार्च) बैठक होती. लोकसभेच्या अनुशंघाने ही बैठक असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीला आ. प्राजक्त तनपुरे, माजी आ. दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी या बैठकीला आ. निलेश लंके यांनी हजेरी लावल्याने त्यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाला पुष्टी मिळत आहे. आजपर्यंत निलेश लंके यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नव्हती परंतु आता ही उपस्थिती सर्वकाही सांगून जाते अशी चर्चा नागरिकांत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...