spot_img
अहमदनगरमहाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ? नगर लोकसभा मतदारसंघात नवा भिडू

महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ? नगर लोकसभा मतदारसंघात नवा भिडू

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या रणांगणात गुरुवारी नवा भिडू दाखल झाला आहे. एमआयएम तर्फे डॉ. परवेश अशरफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. अशरफी निवडणुकीच्या मैदानात आल्याने अल्पसंख्यांक मतांवर डोळा ठेऊन असलेल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. डॉ. अशरफीच्या रुपाने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

अहमदनगर दक्षिण नगर लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना त्यात आता एमआयएमने उडी घेतल्याने या निवडणुकीला चांगलीच रंगत येणार आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आधीच महविकास आघाडीवर कुरघोडी करत प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीला उमेदवार सापडत नसल्याने आयता उमेदवार घेऊन निलेश लंके यांना मैदानात उतरविले. पण तोवर वेळ निघून गेली होती. कारण डॉ. सुजय विखे यांनी तोपर्यंत संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढत मतदारांच्या गाठी भेटी वाढवत आपले वातावरण तयार केले आहे.

यामुळे महाविकास आघाडीने मतदार संघातील अल्पसंख्याक समाजावर आपले लक्ष केंद्रीत करत त्यांना आपल्या गळाला लावण्याचा जोरदार प्रयत्न चालवला आहे. पण आता खुद्द एमआयएम ने आपला गडी रिगंणात दिल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेची वातावर आहे. एमआयएम ने दिलेले उमेदवार डॉ. परवेश अशरफी हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.

महाविकास आघाडीने केवळ अल्पसंख्यांक मतांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला असून राज्यात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही. यामुळे अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचे डॉ. अशरफी यांनी सांगितले. त्यांना जनता आता किती साथ देणार हे तर ४ जूनला समोर येईल. पण दक्षिण लोकसभा मतदार संघात एमआयएम दाखल झाल्याने तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...