Crime news: पिंपरी चिंचवड येथे रविवारी 11 मे रोजी एका 18 वर्षीय तरुणीचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर आली होती. या घटनेची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये असलेल्या संबंध आणि आर्थिक व्यवहारातून ही हत्या शेजाऱ्याने केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मामा भाच्याला दोघांना ताब्यात घेतलं आहे. कोमल भरत जाधव (18 वर्ष) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. उदयभान यादव (वय 45) आणि त्याचा सख्खा भाचा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, खून झालेली तरुणी कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. रविवारी कोमल जाधव घरामध्ये होती. यादव हा तिच्याच शेजारी वास्तव्यास होता. त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाले होते. त्यामुळे उदयाभान याने कोमल हिला संपवण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार त्याने आपल्या भाच्याच्या मदतीने रविवारी रात्री दुचाकीवरून डोक्यात हेल्मेट घालून कोमलला घराच्या बाहेर बोलावून घेतलं. कोमल घराच्या खाली आली, त्यानंतर तिच्यावर शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वाल्हेकरवाडी परिसरात भीतीचं वातावरण पसरले. याप्रकरणी उत्तर प्रदेशाचा रहिवाशी असलेल्या 45 वर्षीय मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या सख्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे.