सुपा | नगर सह्याद्री
नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण चौपदरीकरणासाठी ग्रामस्थांनी सातत्यपूर्ण लढा सुरू ठेवत गावाच्या सुरक्षेसाठी प्रशासकीय कार्यालयाच्या पायर्या झिजवल्या परंतु प्रशासकीय अधिकार्यांना कर्तव्याची जाणीव राहिलेली दिसत नाही. ग्रामस्थांच्या उपोषणाला चार दिवस उलुटन गेले तरी प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात उपोषणासोबत जलत्याग करणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते सचिन शेळके यांनी दिला.
नारायणगव्हाण गावातील ग्रामस्थ जिव मुठित धरून महामार्गावर दळणवळण करत आहेत. महामार्गावर दिवसेंदिवस गाड्यांची संख्या वाढत असुन आज चौपदरीकरणही अपूरे पडत आहे. भरधाव वाहणारी वाहने नारायणगव्हाण गावात अरुंद रस्त्यावर येताच अपघातांची मालिका घडत आहे. त्यात शालेय विद्यार्थांना रोज जीव मुठीत धरून भरधाव वाहणार्या वाहनांसमोर सापशिडीसारखा प्रवास करावा लागत आहे.
पालकांचे काळजाचे विद्यार्थी घरी सुरक्षित आणेपर्यंत पाणी पाणी होत आणि संबंधित विभागांना वेळोवेळी निवेदने आंदोलने करून सातत्यपूर्ण लढा देत ग्रामसुरक्षेसाठी यथोचित सर्व प्रयत्न ग्रामस्थांकडून होत आहेत परंतु अधिकार्यांना परिस्थितीच गांभिर्य नाही यांचा वेळकाढूपणा एक दिवस आमच्या जिवावर येईल अशी भिती नारायणगव्हाणच्या ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली आहे. नारायगव्हाण ग्रामस्थांच्या उपोषणाचा चौथा दिवस असुन आंदोलनस्थळी अनेक पंचक्रोशितील ग्रामस्थांसोबत प्रवाशीही भेटी देवुन प्रशासकीय अधिकार्यांनी गमावलेल्या विश्वासहर्तबद्दल शोक व्यक्त करत आहेत.