spot_img
ब्रेकिंग'जिल्हा शिक्षकेतर महासंघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नंदकुमार कुरुमकर'

‘जिल्हा शिक्षकेतर महासंघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नंदकुमार कुरुमकर’

spot_img

श्रीगोंदा। नगर सहयाद्री
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचे सुपुत्र शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व व एक निर्भीड व धाडसी नंदकुमार कुरुमकर यांची नुकतीच जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर संघाच्या प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर महासंघाचा जिल्हास्तरीय मेळावा अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण फार्मसी कॉलेज येथे राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी राज्य कार्यकारिणीने जिल्हा व तालुका कार्यकारिणींच्या यावेळी सक्षम कार्यकर्त्यांच्या निवडणुका करण्यात आल्या. त्यामध्ये श्रीगोंदातून श्री व्यंकनाथ विद्यालयाचे नंदकुमार कुरुमकर यांची याप्रसंगी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून राज्य अध्यक्ष वाल्मीक सुरासे यांनी नियुक्तीपत्रद्वारे जाहीर केली.

दरम्यान पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी गेली ३५वर्ष तालुका व जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे विविध पदावर प्रतिनिधित्व केले एक धाडसी व शिस्तप्रिय म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळख आहे प्रसिद्धीच्या माध्यमातून त्यांनी विशेषता शिक्षण क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व ज्ञानदान करणाऱ्या गुणवंत शिक्षकांच्या विशेष कर्तव्याचे वेळोवेळी लिखाण करून एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे मौलिक काम केले आहे.

त्यांच्या या निवडीने निश्चितच राज्य व जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर महासंघाला प्रसिद्धीच्या माध्यमातून मोठे बळ मिळणार आहे. कुरुमकर हे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने व सतत शिक्षक, शिक्षकेतरांच्या विविध प्रलंबित प्रश्न संदर्भात नेहमीच शासन दरबारी प्रसिद्धीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात त्यांचे कार्य निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी समजले जाते.

प्रसंगी जिल्ह्यातील असंख्य शिक्षकेतर बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवडीचे पत्र राज्य अध्यक्ष वाल्मीक सुरासे यांनी कुरुमकर यांना प्रधान केले. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर राज्याध्यक्ष वाल्मीक सुरासे, राज्य सचिव पाराजी मोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक समशेर पठाण, राज्य उपाध्यक्ष राजू पठाण, जिल्हा उपाध्यक्ष परशुराम वेताळ, सचिव भाऊसाहेब धनवटे, जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमजान हवलदार, माध्यमिक सोसायटीचे चेअरमन दिलीपराव काटे, संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, निरीक्षक बी के लगड, अशोकराव आळेकर, वसंतराव पवार, विलास साळवे, किशोर जामदार, तालुका अध्यक्ष सुनील म्हस्के, प्राचार्य दत्तात्रय सस्ते आदींनी कुरुमकर यांचे अभिनंदन केले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...