spot_img
अहमदनगरअवधूत गुप्तेंच्या सुरमयी स्वरांनी नगरकर चिंब भिजले

अवधूत गुप्तेंच्या सुरमयी स्वरांनी नगरकर चिंब भिजले

spot_img

हजारोंच्या उपस्थितीत रंगला गुढीपाडवा रसिकोत्सव सांस्कृतिक सोहळा
अहमदनगर / नगर सह्याद्री –
आम्ही कलाकार आयुष्यभर रसिकांसाठीच काम करतो असतो. ज्याच्या नावातच रसिक शब्द आहे अशा रसिक ग्रुपनेच या गुढीपाडवा सांस्कृतिक सोहळ्याचे भव्य आयोजन केल्याचा वेगळा अनंद येथे वाटत आहे. नगरकरांनी कायमच माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे आजच्या मराठी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मला नगरकरांचे मुखदर्शन झाल्याने येणारे पूर्ण वर्ष माझे सुखात जाणार आहे. रसिक ग्रुपने रसिककला गौरव पुरस्कार देवून मला सन्मानित केल्याबद्दल आभार, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी नगरमध्ये केले.

गुढीपाडव्यापासून सुरु होणारे मराठी नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी रसिक ग्रुपच्या वतीने आयोजित ‘रसिकोत्सव’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखले जाणरे सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी धमाल उडवत लाईव्ह इन कॉन्सर्ट कार्यक्रमाद्वारे रसिक नगरकरांना मंत्रमुग्ध केले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ढंगात सादर केलेल्या मराठी गाण्यांवर उपस्थित प्रक्षकांनी अवधूत गुप्ते यांना अक्षरशः डोक्यावर घेत ताल धरला. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे उत्साहीत झालेल्या अवधूत गुप्तेंना थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन गाणे म्हणण्याचा व नाचण्याचा मोह आवरला नाही. उत्कृष्ट साउंड, लाईट इफेक्ट व आकर्षक आतिषबाजीमुळे हा सोहळ्याला मोठ्या रियालिटी शोचे स्वरूप मिळाल्याने अनोखी रंगत आली. यावेळी रसिक ग्रुपच्या वतीने अवधूत गुप्ते यांना रसिक कला गौरव पुरस्कार विशेष पोलीस महासंचालक बी.जी.शेखर पाटील व मनापा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या हस्ते देवून विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी खा.डॉ.सुजय विखे, सी.जी पॉवर कंपनीचे उपाध्यक्ष इंद्रनील धनेश्वर, कार्यक्रमाचे संयोजक जयंत येलूलकर यांच्या सह सर्व प्रायोजक, विविध क्षेत्रतिल नागरिक व हजारो रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

यावेळी अवधूत गुप्ते तूच माझी आई देवा… हे भक्ती गात स्टेजवर इंट्री केली. बाई बाई मन मोराचा…, राणी माझ्या मळ्यामंदी…, अशी अनेक गाजलेली मराठी गाणे सादर करत छत्रपती शिवाजीमहाराजांचे राजं आलं राजं आलं जग जिंकुनी… गाणे सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताने त्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांनी बाईपण भारी देवा चित्रपटातील मंगळागौरीच्या गाण्यावर सह कलाकारांसह ताल धरत उपस्थित महिलांनाही ताल धरायला लावला. तसेच मुग्धा कऱ्हाडे यांची ठसकेबाज लावणी रंगली. पार्श्वगायक कौस्तुभ गायकवाड याने लग्नाळू गाणे सादर केले. महागायिका सन्मित धापते-शिंदे यांनी प्रेम गीत सादर केले. यावेळी प्रेक्षकांनी शिट्या व टाळ्यांची बरसात करत सर्व कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली. गुढीपाडव्याच्या रम्य सायंकाळी सुरमयी गीतांनी सुरु झालेली रासिकोत्सव मैफल रात्री पर्यंत रंगतच गेली. प्रसिद्ध अभिनेत्री पूर्वी भावे यांचे प्रभावी निवेदन सर्वांना भावले. नगरचे स्थानिक कलाकार बासरीवादक ऋषभ भाळगट, उभरत्या गायिका कु.अपूर्वा निषाद व आसावरी पंचमुख यांनी सुंदर गाणे सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

विशेष पोलीस महासंचालक बी.जी.शेखर पाटील म्हणाले, रसिक ग्रुपचा रासिकोत्सव हा अतिशय सुंदर कार्यक्रम दरवर्षी होत आहे. शहराचे वैभव फक्त विकासानेच वाढत नसते तर सांस्कृतिक उपक्रमांनीही वाढत असते. सांस्कृतिक वारसा व मुल्ये जपण्याचे काम रसिक ग्रुप करत आहे, असे सांगून नगरकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी रसिक ग्रुपच्या उपक्रमचे कौतुक करत आभार मानले. प्रास्ताविकात जयंत येलूलकर म्हणाले, आपल्या नगर शहराचा सर्वांना अभिमान असावा. जर शहरावर सर्वांनी प्रेम केल्यास शहर समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही. उद्याच्या पिढीला चांगले शहर दाखवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यासाठी रसिक ग्रुप प्रयत्नशील आहे. अवधूत गुप्ते यांनी पूर्ण देशात मराठी भाषेची परंपरा जप्त रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. अनेक गरजू व ग्रामीण भागातील मुलांमधील न्यूनगंड काढून त्यांना उभे करत कलाकार घडवले आहेत. त्यांचे हे सामाजिक काम खूप मोठे आहे. त्यामुळे रसिक ग्रुपने त्यांना रसिक कलागौरव पुरस्कणारे सन्मानित केले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. यावेळी संपत बारस्कर, बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा, प्रायोजक सुभाष कायगावकर, श्रीमती छाया फिरोदिया, अशा फिरोदिया, राजेश भंडारी, सतीश बोथरा, के.के.शेट्टी, शशीकांत गुळवे, सौ.मंजू मुनोत, पियुष मुनोत, डॉ.गोपाल बहुरूपी, यशवंत शिंदे, प्रा.तुषार आंबाडे, रमेश फिरोदिया, अमित बुरा, कार्तिक नायर, विजय गडाख, रामदास खांदवे, मकरंद कुलकर्णी, डॉ.प्रकाश व डॉ.सुधा कांकरिया, श्रीकृष्ण जोशी, श्रीहरी टिपूगडे, विजय इंगळे, गौतम मुनोत, जितेंद्र बिहाणी, गणेश भूतारे, किरण कठडे, बाळासाहेब विश्वासराव, सुरेश चव्हाण, सागर नाईक, स्वस्तिश्री गरुड, कारभारी भिंगारे, अक्षय वाघमोडे, हरीश बऱ्हाडे, संग्राम तेलगी, सतीश कोंडाळकर, लातूरचे उद्योजक भागवत तेलगे, आकाश जोशी व माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत उपस्थित होते.

कार्यक्रमास आलेल्या प्रेक्षकांना गुलाब पुष्प, महिलांना गजरे देवून व सुगंधी अत्तर लावून स्वागत करण्यात येत होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी रसिक ग्रुपचे, दिपाली देऊतकर, निखील डफळ, ऋषिकेश येलुलकर, प्रशांत देशपांडे, सुदर्शन कुलकर्णी, समीर पाठक, श्रीक्रुष्ण बारटक्के, तेजा पाठक, शारदा होशिंग, स्नेहल उपाध्ये, संकेत होशिंग, प्रशांत अंतापेट्टू, मीनाक्षी पाटील, प्रसन्न एखे, हनीफ शेख, बालकृष्ण गोटीपामुल, कार्तिक नायर, तेजस अतीतकर, संकेत होशिंग, प्रशांत देशपांडे, विनिता गुंदेचा, पंकज भूतारे, नंदकुमार येलुलकर, शैलेश थोरातराज जोशी, तुषार बुगे, प्रा.सुवर्णा बेनके आदींनी परिश्रम घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...