अहमदनगर / नगरसह्याद्री : मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. तसेच महाराष्ट्रातून बहुतांश ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. आता अहमदनगरमधील ‘नगर शहर मराठा डॉक्टर संघटना’ मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास व ओबीसी मधून मराठा आरक्षण या मागणीस जाहीर पाठिंबा निवेदनाद्वारे ‘नगर शहर मराठा डॉक्टर संघटना’ने दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, आम्ही मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज, अहमदनगर अंतर्गत नगर शहर मराठा डॉक्टर संघटना आपणाद्वारे महाराष्ट्र शासनास निवेदन देत आहोत.
आंतरवाली सराटी, जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मधून मराठा समाजास कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण मिळावे म्हणून जे प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे त्यास आम्ही पाठिंबा देत आहोत. तरी आपण महाराष्ट्र शासनास आमची मागणी कळवावी अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर डॉ. दिलीप पवार, डॉ. सचिन पांडुळे, डॉ. विजय कवळे, डॉ. अविनाश मोरे, डॉ. मंगेश काळे, डॉ. सुनिल बोठे, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. मधुकर गव्हाणे, डॉ. मंगेश जाधव, डॉ.बाळासाहेब शेवाळे, डॉ. रोहीत करांडे, डॉ.अमित पवार, डॉ. संदिप अनभुले, डॉ. महेश डोके, दीपक करांडे, डॉ. झुंजारराव झांजे आदींच्या सह्या आहेत.