spot_img
अहमदनगरहात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

spot_img

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी

श्रीगोंदा | नगर सह्याद्री – 
श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे खून करून मृतदेहाला पोत्यात बांधून विहिरीत टाकून दिलेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटली असून खून करणार्‍या संबंधित आरोपीसही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माउली सतीश गव्हाणे (वय-१९, रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव तर ताब्यात घेतलेेल्या आरोपीचे नाव सागर दादाभाऊ गव्हाणे (वय-२०, रा. दाणेवाडी) असल्याचे उघड झाले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी, की १२ मार्च २०२४ रोजी दाणेवाडी येथील विठ्ठल दत्तू मांडगे यांच्या शेतातील विहिरीत पोत्यात बांधलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्या तरुणाचे मुंडके, उजवा पाय व दोन्ही हात धडापासून वेगळे करण्यात आले होते. या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक मारुती केशव लोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केला. या कामी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपास करण्याचे आदेश दिला.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार बापूसाहेब फोलाणे, शाहीद शेख, बिरप्पा करमल, अरुण गांगुर्डे, संतोष खरै, रवींद्र घुंगासे, आकाश काळे, विशाल तनपुरे, सागर ससाणे, प्रमोद जाधव, रोहित मिसाळ, अशोक लिपणे, अमोल कोतकर, मनोज लातूरकर, जालिंदर माने, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, महादेव भांड आदींचे पथक शोध मोहिमेवर गेले. मृतदेहाच्या कानातील बाळी, फोटो आदींवरून नातेवाईकांकडे चौकशी करून ओळख पटविली.

खून झालेल्या तरुणाचे नाव माउली सतीश गव्हाणे असल्याचे आढळून आले. हा खून सागर दादाभाऊ गव्हाणे याने केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेऊन त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...