spot_img
अहमदनगरमोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझा अनुक्रमांक तीन : डॉ. सुजय विखे पाटील

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझा अनुक्रमांक तीन : डॉ. सुजय विखे पाटील

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तिसऱ्या प्रर्वाची ही वाटचाल सुरू आहे.  याच धर्तीवर मला अनु. क्र. ३ मिळाला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अनु.  क्र. ३ चे बटन दाबा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ते नगरमधील एका संवाद सभेत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७ मे रोजी नगर मध्ये भव्य सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी  ठिकठिकाणी संवाद सभांचा वेग वाढविला आहे. नगर जिल्ह्यातील कामरगाव येथे अशाच संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना डॉ. विखे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या मागील दोन पर्वातील केलेल्या कामामुळे देशात मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा गाढा विश्वास आहे. यामुळे त्यांची तिसऱ्या पर्वाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. आणि हा नियतीचा योगायोग आहे की, त्यांच्या या वाटचालीत मला संधी देण्यासाठी तीन क्रमांकाचे बटन मिळाले आहे. यामुळे आता विजयांची चिंता उरली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विकासाच्या रथावर जिल्ह्याचा विकास साधण्याचे ध्येय मी उराशी बांधले आहे. म्हणुन तुम्ही सुद्धा या तिसऱ्या पर्वाचे साक्षिदार होण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देश देण्यासाठी अनु क्रं ३ चे बटण दाबावे असे त्यांनी सांगितले. सदर संवाद सभेत जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Politics News: लंके यांचा आमदारकीचा राजीनामा स्विकारला

पारनेर | नगर सह्याद्री अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता....

Politics News: बहुमत मिळाले नाही तर भाजपाचा प्लॅन बी? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले विश्लेषण

Politics News: लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. २० मे रोजी पाचव्या टप्प्याचे...

Ahmednagar Crime: बाजारपेठेत तरुणावर खुनी हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर | नगर सह्याद्री शिवसेनेचे पदाधिकारी सचिन जाधव यांच्यावर १२ मे रोजी झालेल्या हल्ल्याची घटना...

सावधान! पुढील पाच दिवस उष्णतेची लाट, हवामान खात्याचा नवा अंदाज काय? पहा..

मुंबई | नगर सह्याद्री पुढील पाच दिवस शुक्रवार १७ मे ते मंगळवार २१ मे...