spot_img
ब्रेकिंग१० गुंठे शेतीची परस्पर विक्री! तोतया महिलेच्या उपिस्थत नोंदवला दस्त, 'असा' घडला...

१० गुंठे शेतीची परस्पर विक्री! तोतया महिलेच्या उपिस्थत नोंदवला दस्त, ‘असा’ घडला प्रकार

spot_img

बनावट कागदपत्रेद्वारे जमिनीची परस्पर विक्री
अहमदनगर | नगर सह्याद्री
खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून व तोतया महिलेचा वापर करून बुर्‍हाणनगर (ता. नगर) शिवारातील १० गुंठे शेत जमिनीची परस्पर विक्री केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी (दि. ११) सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ललीता माणिकराव कादबने (वय ६७ रा. कलानगर, गुलमोहर रस्ता, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. प्रशांत बाळू शिंदे (रा. तिसगाव ता. पाथर्डी), साठेखत दस्त व जनरल मुखत्यारपत्र दस्तात उभी राहिलेली तोतया महिला (नाव, पत्ता माहिती नाही), ज्ञानेश्वर साहेबराव बोरसे (रा. बुरूडगाव ता. नगर), भारत आण्णा शिंदे (रा. सावेडी), योगेश जगदीश सगळगिळे (रा. कोठी, स्टेशन रस्ता), अमर देविदास बोरा (रा. तपोवन रस्ता, तपोवन हाडको, सावेडी), संदीप आनंदा थोरात (रा. कल्पतरू हौसिंग सोसायटी, सावेडी), विठ्ठल शंकर उमाप (रा. सिध्दार्थनगर, सावेडी) व अंबादास रतन नवगिरे (रा. सांगवी बु. ता. पाथर्डी, हल्ली रा. ममता गॅस एजन्सी शेजारी, गुलमोहर रस्ता, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी यांची बुर्हाणनगर शिवारात सर्व्हे नंबर ६५/ २ मध्ये १० गुंठे शेतजमिन होती. या जमिनीची परस्पर विक्री करण्यासाठी एका तोतया महिलेने तिचे बनावट आधार कार्ड तयार केले व तिच फिर्यादीच्या जमिनीची मालक असल्याचे दाखविले. प्रशांत बाळू शिंदे व इतरांनी तोतया महिलेचा वापर करून फिर्यादीच्या जमिनीचे प्रथम रजिस्टर साठेखत तयार केले व लगेच त्या आधारे बनावट मुखत्यारपत्र केले. त्या जनरल मुखत्यारपत्राचे आधारे सह दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदीखत करून घेतले. फिर्यादी यांची १० गुंठे शेतजमिन नोंदणीकृत दस्ताने परस्पर विक्री करून फिर्यादी यांची फसवणूक केली.

दरम्यान फिर्यादी व त्यांचे पती जून २०२३ मध्ये बुर्हाणनगर तलाठी कार्यालय येथे शेतजमिनीचा कर भरण्यासाठी गेले असता त्यांनी जमिनीचा सातबारा पाहिला, त्यावर फिर्यादीची नावावरील जमिनीची विक्री झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तक्रार अर्ज दिला होता. त्या तक्रार अर्जाची कोतवाली पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. सहा. पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...