spot_img
अहमदनगरसंगीत तज्ञ डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांचे निधन

संगीत तज्ञ डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांचे निधन

spot_img

अहमदनगर / नगरसह्याद्री : प्रा.डाॅ. देवीप्रसाद खरवंडीकर यांचे आज (दि.१४) निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्यावर आज दुपारी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉक्टर खरवंडीकर यांचा जन्म एक ऑक्टोबर 1935 रोजी झाला. ते संस्कृत साहित्यिक होते. ग. दि. माडगूळकरांचे गीत रामायण आणि भा.रा. तांबे यांच्या कवितांचा त्यांनी संस्कृत अनुवाद केला.

संस्कृत भाषेचा गेल्या पन्नास वार्षांपासूनच त्यांचा व्यासंग राहिला आहे.‌ अनेक शोधनिबंधाचे त्यांनी लिखाण केले. पंचवीस ग्रंथांचे संपादन, 20 स्वतंत्र संस्कृत ग्रंथांचे लेखन, दोनशेहून अधिक संस्कृत कविता आणि दीडशे पेक्षाही अधिक संपादकीय लेख प्रसिद्ध आहेत. 50 हून अधिक पीएचडीच्या प्रबंधाचे परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना संस्कृत पंडित ही पदवी देखील मिळाली होती. त्यांना सावेडी भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...