अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर शहरातील 30 वषय तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवार (ता. 24) रोजी केडगाव परिसरात घडली. विपुल छोट्या काळे (वय 30, रा. शास्त्रीनगर, केडगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी शास्त्री छोट्या काळे ( वय 60 वर्षे रा. शास्त्रीनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश जाठला काळे, संदीप ढोल्या चव्हाण, कुणाल सुरेश काळे तिघे (रा. दूधसागर, केडगाव), चाईन फायर काळे, दारुचंद फायर चव्हाण, सुदंर नितीन काळे तिघे (रा. साठे वस्ती, शेंडी ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपुल छोट्या काळे केडगाव परिसरात वास्तव्यास होता. काही दिवसापासून विपुलचे आणि आरोपी नातेवाइकांचे वाद सुरु होते.
जुना वादच टोकाला गेला. त्यानंतरआरोपींनी पुन्हा त्याला लाकडी दांडके, दगड व लाथाबुक्कयांनी मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला.रुग्णालयात दाखल करण्यापूवच त्याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गु्हा नोंदवण्यात आला आहे. या हत्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मागदर्शनाखाली पोलीस करत आहे.