spot_img
अहमदनगरAhmednagar: मनपा कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द? 'या' सर्वेक्षणासाठी महत्वाचा निर्णय!

Ahmednagar: मनपा कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द? ‘या’ सर्वेक्षणासाठी महत्वाचा निर्णय!

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी पुढील आठवडाभर होणार्‍या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आले आहेत. १९ जानेवारीपर्यंत कोणालाही सुट्टी देऊ नये, असे आदेश आयुक्त पंकज जावळे यांनी विभाग प्रमुखांना काढले आहेत.

शहरात सर्वेक्षणासाठी किमान तीन हजार कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. यात ५०० मनपा कर्मचारी व इतरांची नियुक्ती केली जाणार आहे.राज्य शासनाने येत्या आठवडाभरात सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी गुरुवारी बैठक घेऊन या संदर्भात सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार नगर शहरातील सुमारे सव्वालाख कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.जनगणनेसाठी केलेल्या प्रगणक गटानुसार हे सर्वेक्षण करण्याचे नियोजन मनपास्तरावर सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा जिल्हाधिकार्‍यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. कर्मचारी नियुक्तीबाबत आदेश काढण्याची लगबग प्रशासन स्तरावर सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

​कामरगावात दुकानदाराचे घर फोडले; पावणेदोन लाखांचा ऐवज लांबविला

​लबाडीच्या इराद्याने घरातील वस्तू, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला; नगर तालुका पोलिसांत गुन्हा...

आमदार काशिनाथ दाते यांनी मोठे यश; एक वर्षात काय काय केले…

पारनेरला ६० तर अहिल्यानगर तालुक्याला ९ कोटींचा निधी / | नवनागापूरमधील कार्यक्रमात एक वर्षांतील...

​अरणगावात चोरट्यांचा धुमाकूळ; काय घडलं पहा

​अहिल्यानगर /नगर सह्याद्री - नगर तालुक्यातील अरणगाव येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत...

कोर्टात रक्तरंजित थरार! न्यायाधिशांसमोरच महिलेच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, कुठे घडला प्रकार

कोल्हापूर / नगर सह्याद्री - कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान न्यायाधिशांसमोच एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक...