spot_img
अहमदनगरमनपाची ‌‘टांग‌’ अन्‌‍ बसस्थानकाला ‌‘मुडदूस‌’

मनपाची ‌‘टांग‌’ अन्‌‍ बसस्थानकाला ‌‘मुडदूस‌’

spot_img

माळीवाडा बसस्थानकाची व्यथा; मनपा ‌‘ढिम्म‌’| माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केला संताप व्यक्त
अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:-
‌‘कॅल्शियम‌’ आणि ‌‘व्हिटॅमिन डी‌’च्या कमतरतेमुळे माणसाला विशषेत: लहान मुलांना ‌‘मुडदूस‌’ नावाचा रोग होतो. या रोगामुळे शरीराची वाढ लवकर होत नाही व हाडेही मजबूत होत नाहीत. तसेच काहीस माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरण कामाचे झाले आहे. महापालिकेने कामासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या रखडल्याने या बसस्थानकालाही ‌‘मुडदूस‌’ झाला आहे. कामांत वाढ होत नाही, काम पुढे सरकत नाही. त्यामुळे बसप्रवाशांचे मात्र अतोनात हाल होत आहेत. तब्बल दोन महिने होऊनही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळत नसल्याने महापालिकेचे माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे संताप व्यक्त केला आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी सामान्य माणसांच्या सोयीसाठी, विद्यार्थ्यांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या, महिलांच्या प्रवासाची गैरसोय दूर व्हावी म्हणून माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी सरकार दरबारी अथक परिश्रम करून तब्बल साडे सोळा कोटी रुपयांचा निधी आणला. महानगरपालिकेच्या हद्दीतील कोणत्याही जागेत नव्याने बांधकाम करायचे असल्यास किंवा जुन्या वास्तूचे नूतनीकरण किंवा जीर्णोद्धार करायचे असल्याचे महापालिकेकडून विविध परवानग्यांची आवश्यकता असते. माळीवाडा बसस्थानकासाठीही ती आवश्यक आहे. त्यामुळेच अहिल्यानगरचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी मनपाला त्याप्रमाणे अर्ज केला.

तसेच महापालिका विकासकामासाठी जो चार्ज लावते त्याचा दर शिथिल करण्याची मागणीही केली. कारण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे रोड ट्रान्स्पोर्ट ॲक्ट 1950 अन्वये महाराष्ट्र सरकारच्या अधीन असलेले महामंडळ आहे. ते लोकसेवेसाठी चालविले जाते. राज्य सरकारने नेमलेल्या व्यवस्थापकीय संचालकांकरवी परिवहन महामंडळ चालविले जाते. सध्या डॉ. महादेव कुसेकर हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तेव्हा हे एसटी महामंडळ पूर्णपणे सरकारच्या मालकीचे आहे, खाजगी नाही, याची आठवण विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी महापालिकेला नुकत्याच पाठविलेल्या स्मरणपत्रात करून दिली आहे.

माळीवाडा येथील जुन्या बसस्थानकाच्या जागी नवीन अद्ययावत बसस्थानक उभारण्यात येत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या एसटी महामंडळाला हव्या असून लोकसेवेेसाठी हे बसस्थानक चालविले जाते. त्यामुळे एमआरटीपी ॲक्ट 1966 च्या सेक्शन 124 एफ आणि युडीपीसीआर महाराष्ट्र स्टेट मधील तरतुदीनुसार प्रकल्पाच्या विकासासाठी लागणाऱ्या दर शिथिल करावेत अशी आठवण राजेंद्र जगताप यांनी महापालिकेला करून दिली आहे.
महापालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याने बसस्थानकाची गाडी पुढे सरकत नाही. महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज करूनही परवानगीचे पत्र एसटी महामंडळाला मिळत नाही. आयुक्त यशवंत डांगे हे कार्यक्षम असल्याचे सांगितले गेले; परंतु ती कार्यक्षमता एसटी बसस्थानकाच्या कामासाठी कुठे गेली असा सवाल भोसले यांनी उपस्थित केला आहे.

नगररचनाच्या निष्क्रिय कारभारामुळे बसस्थानकाचे काम थांबले…
माळीवाडा बसस्थानकाचे काम केवळ फाईलमध्ये नाही, प्रत्यक्षात सुरूही झालंय… पण आता नगररचना विभागाच्या बोगस आणि निष्क्रिय कारभारामुळे हे काम थांबलंय…! दोन दोन महिने फाईल पुढे सरकत नाही. परवानग्या अडकतात, प्रश्न विचारले जात नाहीत, आणि जनता मात्र उन्हातान्हात उभी राहते! हे केवळ अक्षम्य नाही, तर किळसवाणं आहे. जनतेच्या अपेक्षांवर आणि आमदारांच्या अथक मेहनतीवर पाणी फेरणं योग्य आहे का? आयुक्त साहेब, हे काम फाईलमध्ये नाही, हजारो जिवांचा प्रश्न आहे. आपली यंत्रणा जर अशीच चालणार आहे का? नगर रचना विभागातील कारभार योग्य आहे का? काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे कितपत योग्य आहे? जनतेच्या हिताचा निर्णय व्हावा, अशी अपेक्षा गणेश भोसले यांनी व्यक्त केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्रिमंडळात धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार; पहा निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे ७ निर्णय...

बीड पुन्हा हादरलं! ग्रामपंचायत सदस्याला संपवल, कोयत्याने सपासप वार

Beed Crime: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अवघे काही महिनेच उलटले...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ‘तो’ निर्णय भोवला; कुस्ती पंच तीन वर्षांसाठी निलंबित

अहिल्यानगरमधील 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वादग्रस्त निर्णय | राज्य कुस्तीगीर संघाची कारवाई पुणे...

सावधान! नागरिकांनो बाहेर पडण्यापूर्वी हवामान खात्याचा अंदाज वाचा

Maharashtra Heatwave: राज्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. सोमवारपासून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातीलअनेक...