spot_img
अहमदनगरमनपाचे 1680 कोटींचे बजेट मंजूर

मनपाचे 1680 कोटींचे बजेट मंजूर

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर महानगरपालिकेचा सन 2024-2025 चा सुधारीत व सन 2025-2026 चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मंजूर केला आहे. मुख्य व लेखा वित्त अधिकारी सचिन धस यांनी उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, सहायक आयुक्त निखिल फराटे, सपना वसावा, प्रियंका शिंदे, नगरसचिव मेहेर लहारे, शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, लेखा विभागाचे अनिल लोंढे तसेच इतर विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकाची प्रत महापालिका आयुक्तांकडे प्रशासकीय स्थायी समितीत सादर केली.

जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक 365.10 लक्ष रुपये व जमा 167631.78 लक्ष रुपयेअशी मिळून एकत्रित जमा 167996.88 लक्ष आणि खर्च 167650.81 व शिल्लक रु. 346.07 लक्षचे महानगरपालिकेचे सन 2025-2026 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले. खर्च बाजूस वेतन, भत्ते व मानधनावर 170 कोटी 64 लाख, पेन्शन 54 कोटी, पाणी पुरवठा विज बिल 40 कोटी, स्ट्रीट लाईट विज बिल 8 कोटी, शिक्षण विभाग वेतन हिस्सा व इतर खर्च हिस्सा 6 कोटी, महिला व बाल कल्याण योजना 3 कोटी 25 लाख, अपंग पुनर्वसन योजना 3 कोटी 25 लाख, मागासवगय कल्याणकारी योजना 8 कोटी 41 लाख, औषधे व उपकरणे 1 कोटी 70 लाख, कचरा संकलन व वाहतूक 18 कोटी, पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती 1 कोटी, टँकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी 2 कोटी 75 लाख, अशुध्द पाणी आकार 4 कोटी, विविध वाहने खरेदी 3 कोटी नविन रस्ते 300 कोटी, रस्ते दुरुस्ती 3 कोटी, इमारत दुरुस्ती 55 लाख, शहरातील ओढ नाले साफसफाई 55 लाख, यासह इतर बाबींबर खर्च अपेक्षित आहे.

खर्च बाजूस वेतन, भत्ते व मानधनावर 170 कोटी 64 लाख, पेन्शन 54 कोटी, पाणी पुरवठा विज बिल 40 कोटी, स्ट्रीट लाईट विज बिल 8 कोटी, शिक्षण विभाग वेतन हिस्सा व इतर खर्च हिस्सा 6 कोटी, महिला व बाल कल्याण योजना 3 कोटी 25 लाख, अपंग पुनर्वसन योजना 3 कोटी 25 लाख, मागासवगय कल्याणकारी योजना 8 कोटी 41 लाख, औषधे व उपकरणे 1 कोटी 70 लाख, कचरा संकलन व वाहतूक 18 कोटी, पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती 1 कोटी, टँकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी 2 कोटी 75 लाख, अशुध्द पाणी आकार 4 कोटी,यासह इतर बाबींबर खर्च अपेक्षित आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जी. एस. महानगर बँक निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार, मोठी माहिती समोर..

पारनेर | नगर सह्याद्री जी एस महानगर बँकेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी मतदारांची नवीन...

स्मशानभूमी परिसरात थाटला ‘ऑक्सिजन पार्क‌‌‌’; नगर जिल्ह्यातील ‘या’ गावाची चर्चा!

वृक्षप्रेमी रसाळ बंधु यांचे कार्य कौतुकास्पद: आमदार काशिनाथ दाते पारनेर । नगर सहयाद्री:- निसर्गाच्या सान्निध्यात वृक्ष...

भैय्या! सुरुवात करतोय, आशीर्वाद असू द्या; किरण काळे पुन्हा शिवसेना मजबूत करणार

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- शिवसेनेचे दिवंगत नेते माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांनी आयरनजर शहरांमध्ये...

‘नगर तालुका पोलिसांची मोठी कारवाई’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत सहा अवैध गावठी हातभट्टीच्या...