spot_img
ब्रेकिंगमुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर, पण कोट्यवधी कमावले! गुजरात टायटन्सलाही लागली लॉटरी

मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर, पण कोट्यवधी कमावले! गुजरात टायटन्सलाही लागली लॉटरी

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम
मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये क्वालिफायर २ मधून स्पर्धेतून एक्झिट घेतली. पंजाब किंग्सने अगदी सहज मुंबई इंडियन्सला पराभूत केले. आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या सहापैकी पाच सामन्यांत पराभव पत्करणारा मुंबईचा संघ क्वालिफायर २ पर्यंत पोहोचेल, याचा विचारही कुणी केला नव्हता. पण, रोहित शर्माला सूर गवसला अन् त्याच्यासोबत मुंबईच्या विजयाची मालिका सुरू झाली. सूर्यकुमार यादव, रायन रिकेल्टन, तिलक वर्मा, नमन धीर यांनी चांगला जोर दाखवला. पण, क्वालिफायर २ मध्ये पंजाबविरुद्ध ते कमी पडले. तरीही ते स्पर्धेतून कोट्यवधी कमावून गेले.

मुंबईने प्रथम फलंदाज करताना ६ बाद २०३ धावा उभ्या केल्या. तिलक वर्मा ( ४४), सूर्यकुमार यादव ( ४४), जॉनी बेअरस्टो ( ३८) व नमन धीर ( ३७) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ही धावसंख्या त्यांनी उभारली. पंजाबचा कर्णधार श्रेयसने ४१ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८७ धावा केल्या. त्याला जॉश इंग्लिसने ३८ ( २१ चेंडू) व नेहल वढेरा ४८ ( २९ चेंडू) धावा करून साथ दिली. पंजाबने १९ षटकांत ५ बाद २०७ धावा करून विजय मिळवला.

मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारे
७१७ – सूर्यकुमार यादव
४१८ – रोहित शर्मा
३८८ – रायन रिकेल्टन
३४३ – तिलक वर्मा
२५२ – नमन धीर
२३३ – विल जॅक्स
२२४ – हार्दिक पांड्या

सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
२२ – ट्रेंट बोल्ट
१८ – जसप्रीत बुमराह
१४ – हार्दिक पांड्या
११ – दीपक चहर
११ – अश्वनी कुमार
१० – मिचेल सँटनर

आयपीएल २०२५ मधील विजेता संघ २० व उप विजेता संघ १३ कोटी रुपये बक्षीस म्हणून जिंकणार आहे. पण, त्याचवेळी क्वालिफायरमध्ये बाद होणारा म्हणजेच मुंबई इंडियन्सचा संघ ७ कोटी रुपये घेऊन गेला आहे, तर एलिमिनेटरमध्ये पराभूत झालेल्या गुजरात टायटन्सला ६.५ कोटी मिळाले आहेत.

१० लाख – ऑरेंज कॅप
१० लाख – पर्पल कॅप
२० लाख – इमर्जिंग प्लेअर
१० लाख – मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअऱ
१० लाख – सुपर स्ट्रायकर
१० लाख – पॉवर प्लेअर
१० लाख – मॅक्सिमम सिक्स
१० लाख – गेम चेंजर

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शनी शिंगणापूर बनावट अ‍ॅप प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर; कोणाच्या खात्यावर पैसे जमा – एसपींनी दिली महत्वाची माहिती

चौकशीतून माहिती उघड | एसपी सोमनाथ घार्गे यांची माहिती अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शनैश्वर देवस्थानशी...

महाभूकंप! ८.७ तीव्रतेच्या भूकंपाने पॅसिफिक महासागर हादरला, त्सुनामीचा धोका

नगर सह्याद्री वेब टीम : रशियाच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या कामचटका द्वीपकल्पाजवळ समुद्राखाली अत्यंत शक्तिशाली भूकंपाची...

शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘दीप चव्हाण’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने दीप...

लाखो नागरिकांचे हाल, केडगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा; मनोज कोतकर यांची मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हात होत आहेत. त्यामुळे...