spot_img
अहमदनगरMP Sujay Vikhe Patil : खासदार विखेंचा वाढदिवस म्हणजे सामाजिक कामांचा उत्सव;...

MP Sujay Vikhe Patil : खासदार विखेंचा वाढदिवस म्हणजे सामाजिक कामांचा उत्सव; जिल्ह्यात इतक्या ठिकाणी झाले कार्यक्रम

spot_img

MP Sujay Vikhe Patil : नगरसेवक निखिल वारे | खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकल महिला, सैनिक नारी, बिडी कामगार महिलांना साडी वाटप
अहमदनगर | नगर सह्याद्री – सण, उत्सव वाढदिवस साजरे करीत असताना सामाजिक भान व बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडावे, जेणेकरून गरजूंना मदत होईल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शिकवणी प्रमाणे जगदंबा युवा प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असतात. खासदार डॉ. विखे पाटील यांनी गेल्या चार वर्षांमध्ये विकास कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर महिलांना धार्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी शिर्डी येथे श्री साईबाबाचे दर्शन घडविण्याचे काम केले आहे. खासदार सुजय विखे पाटील यांचा वाढदिवस म्हणजे सामाजिक कामाचा उत्सव होय, प्रभागातील विकास कामांबरोबरच सामाजिक उपक्रमातून नागरिकांशी ऋणानुबंध निर्माण झाले असून एक विश्वासाचे नाते जपले जात आहे. विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊबीज समजून एकल महिला, सैनिक नारी, बिडी कामगार महिलांना साडीचे वाटप करण्यात आले असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केले

जगदंबा युवा प्रतिष्ठानच्या वतीने खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकल महिला, सैनिक नारी, बिडी कामगार महिलांना साडी वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, नगरसेविका रूपाली वारे, नगरसेविका संध्या पवार, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्रिंबके, सविता मोरे, सुधाकर देशपांडे, मच्छिंद्र तुवर, हेमंत बल्लाळ, अनिकेत चेमटे, निलेश गाडळकर. सोनाली लोखंडे, पूजा यल्ला, श्रीमती पालवे आदीसह जगदंबा युवा प्रतिष्ठान, आदिशक्ती महिला बचत गट, एकल महिला बचत गटचे सभासद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले.

माजी नगरसेवक बाळासाहेब पवार म्हणाले की, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे, याचबरोबर शहराच्या विकासासाठी मोठ्या निधी प्राप्त करून दिला आहे नगरकरांचे उड्डाणपुलाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे तसेच जड वाहतुकीचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लिंक रोडची निर्मिती केली आहे. नगर दक्षिण लोकसभेला विकासाचे व्हिजन असलेले खासदार आपल्याला मिळाले असल्याचे ते म्हणाले.

पूजा यल्ला म्हणाल्या की, प्रभाग क्रमांक दोन चे चारही नगरसेवक प्रभागातील नागरिकांना बरोबर घेऊन कामे करत आहेत नगरसेवकांची एकी व कल्पकता पाहून आम्हाला त्यांचा गर्व आहे ते प्रभागातील नगरसेवक नसून ते आमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आहे. नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन काम करत आहे खासदार डॉटर सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकल महिला, सैनिक नारी, बिडी कामगार महिलांना एकत्रित करून भाऊबीजेची भेट दिली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर खा. सुजय विखे पाटील केंद्रात मंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नगरसेविका रूपाली वारे, संध्या पवार, सुधाकर देशपांडे, नगरसेवक सुनील त्रिंबके आदींची भाषणे यावेळी झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...