spot_img
अहमदनगरAhmednagar News Today:आंदोलन स्थगित! पोलिस निरीक्षक गडकरी यांच्या प्रयत्नाला यश, नारायणगव्हाणकरांचा 'तो'...

Ahmednagar News Today:आंदोलन स्थगित! पोलिस निरीक्षक गडकरी यांच्या प्रयत्नाला यश, नारायणगव्हाणकरांचा ‘तो’ प्रश्न सुटणार

spot_img

सुपा | नगर सह्याद्रीनगर-
पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण चौपदरीकरणासाठी पुकारलेल्या गाव बंद आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने हक्काची सुरक्षेची लढाई करण्यासाठी एकजुट होऊन आंदोलनात सहभागी झाले. यावेळी आंदोलनस्थळी सुपा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ग्रामस्थांची बैठक झाली.

यावेळी ग्रामस्थ आंदोलनावर ठाम होते; परंतु सुपा पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांची बैठक घेत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र १५ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांनी दिला आहे.

उपविभागीय अधिकारी संजय भावसार यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटे मोठे स्पिडब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग, सोलर रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक लावण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तात्पुरते थांबवले. पोलिस निरीक्षकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग येथे आंदोलनकर्ते व ग्रामस्थांची बैठक घेतली व बैठकीत भुमिअभिलेख कार्यालयाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव देण्याचे जाहीर केले.

दोन दिवसात भुमिअभिलेख कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करून संबंधित सर्व विभागांची एकत्रित बैठक १६ तारखेला घेणार असल्याचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांनी सांगितले. आंदोलनस्थळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सरपंच मनिषा जाधव, उपसरपंच राजेंद्र शळके, तान्हाजी पवळे, माजी चेअरमन बाळासाहेब चव्हाण, सुनिल भंडारी, विनायक शेळके, काशिनाथ नवले, काशिनाथ नवले मेजर, बाळासाहेब जगताप, गणेश कोहकडे सर, धनंजय नाईक सर, संपत शेळके, प्रकाश चव्हाण, सुरज खरात, हुसेन शेख, प्रदिप जाधव, दिलिप शेळके, नारायण खोले, मेजर विठ्ठल कांडेकर, भाऊसाहेब शेळके, काशिनाथ कांडेकर, राजू शेळके, हौशिराम कुदळे, शिवाजी भोसले, गणेश नवले, रमेश कोहकडे, सुदाम शेळके, मंगेश शेळके, अक्षय कांडेकर, अक्षय शेळके, चैतन्य खोले, गणेश भोसले, संदिप कांडेकर, संतोष कोहकडे, राजु शेख, रमेश कोहकडे, शंकर हारदे, बाळासाहेब शेळके आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांनी ग्रामस्थांचे, वर्तमान पत्रांचे मनापासुन आभार मानले व नारायणगव्हाण चौपदरीकरणाचा प्रश्न सोडवून ग्रामस्थांना जागेचा योग्य मोबदला दिल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

१५ दिवसांपर्यंत आंदोलन मागे
नगर-पुणे महामार्गासह नारायणगव्हाणमधील प्रलंबित चौपदरीकरणामुळे अपघातांची मालिक थांबायचे नाव घेत नसल्यामुळे २ तारखेला पुकारलेल्या गाव बंद रास्ता रोको आंदोलनात पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्ते, ग्रामस्थांना संबंधित सर्व विभागांसोबत बैठक घेवुन मार्ग काढु असे आश्वासन दिले, यावेळी आंदोलनकर्त्यांनी संयमाची भुमिका घेत परिस्थितीचे गांभिर्य समजावुन सांगितले आता फसवणूक झाल्यास आंदोलनकर्त्यांनी पुन्हा रास्तारोको आंदोलन करू आणि विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेत ग्रामस्थांच्या मध्यस्थीने १५ दिवसांपर्यंत आंदोलन मागे घेतले आहे.

– शरद पवळे, सामाजिक कार्यकर्ते

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...