spot_img
देशPolitics News:भाजपची रणनीती ठरली!! अब की बार ४०० पार...

Politics News:भाजपची रणनीती ठरली!! अब की बार ४०० पार…

spot_img

Politics News:लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात मंगळवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या उच्चपदस्थ बैठकीनंतर पक्षाने कार्यकर्त्यांना ‘तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार ४०० पार’ ही नवी घोषणा दिली. लवकरच प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी नवीन पदाधिकार्‍यांची घोषणा भाजप करणार आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घेतलेल्या दिल्लीतील बैठकीत राम मंदिराचा विषय निवडणुकीपर्यंत तापवत ठेवण्याबाबत सविस्तर रणनीती ठरविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सलग तिसर्‍या लोकसभा निवडणुकीत भाजप ’ब्रँड मोदी’च्याच आधारावर मतदारांसमोर जाणार हे स्पष्ट आहे.

गेल्या पाच वर्षांत भाजपने गरीब कल्याण योजना आणि मोदींच्या प्रतिमेचा प्रचार करून ओबीसी, महिला व आदिवासी समाजाची मते मोठ्या संख्येने आपल्याकडे वळविली आहेत. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालपासून मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरातपर्यंतच्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम दिसला आहे. ठसबका साथ, सबका विकास’ नारा देताना भाजपने विरोधकांच्या निवडणूक शस्त्रांची धार बोथट केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन गटनिहाय बैठका भाजपने सुरू केल्या आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेल्या महाराष्ट्रातही भाजपसमोर कडवे आव्हान आहे. सन २०१९मध्ये महाराष्ट्रात एकट्या भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. आता भाजप २५ पेक्षा अधिक जागांवर उमेदवार उभे करणार आहे. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये किमान आहे तेवढे खासदार टिकवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. शहा यांनी अलीकडेच बंगालचा दौरा केला आणि प्रदेश नेत्यांना ३५ लोकसभा जागा जिंकण्याचे लक्ष्य दिले आहे.

उत्तरेतील ताकद कायम ठेवताना, दक्षिणेत कठोर परिश्रम, हे सूत्र भाजपने स्वीकारले आहे. भाजपचे दोन्ही वरिष्ठ नेते दक्षिणेकडे विशेष लक्ष देत आहेत. नवीन वर्षात तीन आणि चार जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमधून सुरू होईल. उत्तर, ईशान्य आणि मध्य भारतात मजबूत स्थितीत आलेल्या भाजपला या वेळेसही ’ब्रँड मोदी’चाच आधार घ्यावा लागणार किंवा भाजप तसेच करणार हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील बदललेली राजकीय समीकरणे आणि दक्षिणेत काँग्रेसची वाढत चाललेली मजबुती, याकडे पक्षाच्या दोन्ही सर्वोच्च नेत्यांचे बारकाईने लक्ष आहे.

सन २०१९ मध्ये भाजपने कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या सहा राज्यांतील लोकसभेच्या १३० पैकी फक्त २९ जागा जिंकल्या. त्यातही एकट्या कर्नाटकात २५ आणि ४ तेलंगणातील होत्या. २०२३ च्या सुरुवातीलाच भाजपने कर्नाटक गमावले. तेलंगणमध्ये पक्षाच्या हाती भरीव लागू शकले नाही. तेथेही काँग्रेसला आणखी बळ मिळाले. गृहमंत्री अमित शहा यांनी आता तेलंगणमध्ये लोकसभेच्या १७ पैकी १० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भाजप तामिळनाडूतील अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांना एकत्र करण्याचे काम करीत आहे पक्षाशी युती करण्याची योजना आखत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...