spot_img
महाराष्ट्रसासूचे दिवस संपले, आता सुनेचे…; अजितदादांचा टोला, सुप्रियाबद्दल म्हणाले...

सासूचे दिवस संपले, आता सुनेचे…; अजितदादांचा टोला, सुप्रियाबद्दल म्हणाले…

spot_img

 

बारामती / नगर सह्याद्री
बारामती लोकसभा मतदारसंघाती वातावरण चांगलेच तापले आहे. पवार परिवारातच आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडात आहेत. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर आता अजित पवार यांनी समाचार घेतला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या दणक्यात प्रचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बारामती मतदारसंघात सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

“काही वडीलधारे जुना काळ आठवत असतील तर त्यांना म्हणा की जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ पाहा. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येवूद्या. नुसते सासू सासू…मग सुनेने काय नुसते बघत बसायचे का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे पाहतो. मग ४० वर्ष झाले तरी बाहेरची कशी? किती वर्ष झाल्यावर या घरची ते सांगा?”, असा टोला अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना लगावला.

अजित पवार म्हणाले?
राजकारणात मी एक वेगळी भूमिका घेतली. मी एकटा नाही तर प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि ८० टक्के पेक्षा जास्त आमदारांनी ही भूमिका स्वीकारली. १२ वर्षात बारामती मतदारसंघात निधी आलेला नाही. आता विकास करायचा आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे. आता जे लोक तुम्हाला ओळखतही नव्हते, ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. काहीजण भावनिक मुद्दा करतील, पण तुम्ही वेगळा विचार करु नका. विधानसभेला बघू असे म्हणताण आणि तुमच्या पायावर धोंडा पाडून घेताल”, असे अजित पवार म्हणाले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...