spot_img
ब्रेकिंगमान्सूनने यंदा गूड न्यूज दिली! महाराष्ट्रात कधी आगमन होणार? वाचा सविस्तर

मान्सूनने यंदा गूड न्यूज दिली! महाराष्ट्रात कधी आगमन होणार? वाचा सविस्तर

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागांत आला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन क्षेत्राच्या काही भागांत येणार आहे. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

मान्सून यंदा वेळेआधीच दाखल होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागांत आला आहे. तसेच निकोबार बेटांवर 13 मे पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन क्षेत्राच्या काही भागांत येणार आहे. भारतीय हवामान विभागाने दोन दिवसांपूव केरळमध्ये वेळेच्या चार दिवसांपूव मान्सून येणार असल्याचे म्हटले आहे.

2008 नंतर म्हणजेच 18 वर्षांनी मान्सून नियोजित वेळेच्या चार दिवस आधी केरळमध्ये येणार आहे. सध्या मान्सून दक्षिण अंदमान बेटावर आला आहे. 15 मे नंतर त्याची प्रगती वेगाने होणार आहे. त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग, दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग, संपूर्ण अंदमान बेट व्यापणार आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख 31 मे आहे. परंतु यंदा 27 मे रोजीच मान्सून पोहचणार आहे. गोव्यामध्ये पाच जून तर महाराष्ट्रातील किनारपट्टी भागांत 06 जूनपर्यंत मान्सून येण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने यावष सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पावसासंदर्भात भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज 2015 वगळता गेल्या 20 वर्षांत बरोबर ठरला. यंदा अल निनो किंवा ला निना याबाबत कोणतीही परिस्थिती उद्भवणार नसल्याचे म्हटले आहे.

मान्सून कधी कुठे पोहचणार?
05 जून : गोवा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, पश्चिम बंगाल. 06 जून : महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचे किनारपट्टी व्यतिरिक्त जिल्हे. 10 जून : मध्य महाराष्ट्र, मुंबई, तेलंगाणा, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, बिहार. 15 जून : गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश. 20 जून : गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली. 25 जून : राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश. 30 जून : राजस्थान, नवी दिल्ली. हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन-चार दिवसांत राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

साईंच दर्शन अधुरं राहिलं; नवरा-बायकोचा अपघातात मृत्यू, कठे घडली घटना?

Accident News: भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी झाल्याची...

खळबळजनक! कर्जाचा वाद पेटला, पुढे नको तोच प्रकार घडला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कर्जाच्या वादातून तिघा जणांनी एका युवकावर काठी व दगडाने हल्ला केल्याची...

बाजारपेठेतील पार्किंगची समस्या सुटणार!,आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली महत्वाची माहिती..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सर्जेपुरा येथील महानगरपालिकेचे रंगभवन व्यापारी संकुल पाडून त्याजागी व्यापारी संकुल, सांस्कृतिक...

विराटचा कसोटी क्रिकेटला रामराम!, चाहत्यांना मोठा धक्का

नवी दिल्ली | वृत्तसंस्था गेल्या आठवड्याभरात भारतीय क्रिकेट चाहत्यांना दोन मोठे धक्के बसले आहेत. भारतीय...