spot_img
अहमदनगरAhmednagar: सावकाराचा तगादा!! व्याजाच्या वसुलीसाठी 'धक्कादायक' कृत्य

Ahmednagar: सावकाराचा तगादा!! व्याजाच्या वसुलीसाठी ‘धक्कादायक’ कृत्य

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
सावकाराने कर्जवसुलीसाठी तगादा लावून दुचाकी वाहन उचलून नेले. तसेच शिवीगाळ करत जगणे असहाय्य केल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

सचिन सुरेश गवळी (वय ४४४ रा. खाटीक मळा, राजेंद्रनगर, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावकार राजू सयाजी रासकर (रा. मोतीनगर, केडगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नुसार, सचिन गवळी यांनी सन २०१४ ते सन २०१५ साली वेळोवेळी राजू रासकर याच्याकडून पाच लाख ४५ हजार रुपये घेतले होते. दरम्यान सचिन गवळी यांनी सन २०१६ ते सन २०२२ पर्यंत वेळोवेळी व्याज स्वरूपात पाच लाख पन्नास हजार रुपये राजू रासकर यांना परत केले आहे.

बुधवारी सकाळी सचिन गवळी हे त्यांच्या मुलीला शाळेत घेऊन जात असताना रासकर याने त्यांना थांबविले. शिवीगाळ करून ‘माझे अजून सात लाख रुपये व्याजाचे बाकी आहे, ते तू मला परत दे म्हणत त्यांनी सचिन यांची दुचाकी नेली असून व्याजाचे सात लाख रुपये आणून देण्यासाठी सचिन यांच्याकडे तगादा सुरू केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अण्णासाहेब पाटील महामंडळात बोगस लाभार्थी; असे आले उघडकीस…

​बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मराठा...

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...

बिहारमध्ये NDA ला यश, महाराष्ट्रात जल्लोष, पेढे वाटले, ढोल वाजले

मुंबई / नगर सह्याद्री - बिहार विधानसभा निवडणूक २०२५चा आज (१४ नोव्हेंबर) निकाल जाहीर...

बिबट्यांचे हल्ले; पालकमंत्री विखेंनी घेतली मोठी भूमिका

बिबट्यांच्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा नियोजनातून ८ कोटी १३ लाखांचा निधी – पालकमंत्री डॉ....