नगर सहयाद्री टीम-
काही फुले अशी आहेत की ते सुगंधाबरोबर औषधांमध्येही वापरली जातात. मोगरा हेही असेच फूल आहे. हे फूल आपल्या औषधी गुणधर्मांसाठी खूप प्रसिद्ध आहे. याचा वापर केल्याने केसांशी संबंधित असलेलया अनेक समस्या दूर होऊ शकतात.
मोगऱ्याची लागवड कधी करावी?
उन्हाळ्याच्या हंगामात या वनस्पतीला अधिक फुले येतात. त्याच्या पेरणीसाठी मार्च महिना अत्यंत योग्य मानला जातो. पाऊस पडताच या फुलाचे उत्पादन कमी होते. दिवसभरात फक्त २ ते ३ तास सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी या फुलाची लागवड करावी.
अशी घ्या काळजी
मोगऱ्याच्या झाडाला वर्षातून ३ वेळा खत द्यावे. रोप १-२ वर्षांचे झाल्यावर त्यात वाढणाऱ्या फांद्या कापून घ्याव्यात. यामुळे झाडाला अधिक फुले येतात. झाडाला दोन वेळेस पाणी द्या. हिवाळ्यात झाडाला प्रत्येकी एक दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
प्रचंड प्रमाणात मागणी
औषधी गुणधर्मामुळे मोगऱ्याच्या फुलांना बाजारात मोठी मागणी आहे. उदबत्ती तयार करण्यासाठीही याचा वापर केला जातो, त्यामुळे शेतकरी चांगल्या क्षेत्रात या फुलाची लागवड करून भरपूर नफा कमावू शकतात.