spot_img
अहमदनगर'राहुरीत गाजली नीलेश लंके यांची प्रचार सभा' शरद पवार म्हणाले, मोदींची गॅरंटी...

‘राहुरीत गाजली नीलेश लंके यांची प्रचार सभा’ शरद पवार म्हणाले, मोदींची गॅरंटी म्हणजे..

spot_img

राहुरी येथे महायुतीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ सभा | केंद्र सरकारवर हल्लाबोल | विखेंचाही घेतला समाचार
राहुरी | नगर सह्याद्री

भाजप सरकारने गेल्या दहावर्षात दिलेली आश्वासने पाळली नाही. महागाई वाढली, शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे. विरोधात बोलणार्‍यांना ईडीचा धाक दाखविला जात आहे. तसेच विरोध केल्यास जेलमध्ये टाकले जात आहे. मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याने मोदींची गॅरंटी ही टिकाऊ नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवारी नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे सभा झाली. या सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, आपचे जिल्हाध्यक्ष आढाव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, गेल्या दहा वर्षात भाजपा सरकारने देशात काय केले हे त्यांनी सांगितले पाहिजे. गॅस सिलेंडरला दहा वर्षापूर्वी ४१० रुपये भाव होता आज एक हजाराच्या पुढे आहे. दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे भाजप सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात लाट आहे. विरोधात बोलणार्‍यांविरोधात ईडी, सीबीआयचा वापर केला. तसेच काहींना जेलमध्ये टाकले. राज्य सहकारी बँक प्रकरणी मलाही ईडीची नोटीस पाठविली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले. त्यांना जेलमध्ये टाकले. सध्याचेे सरकार हे हुकुमशाही पद्धतीने काम करत आहे. देशातील हुकुमशाही उलथून टाकणारी ही निवडणूक असून या निवडणुकीत हुकुमशाही सरकारला उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही असे पवार म्हणाले.

नगर जिल्ह्यात ५० वर्ष राजकारण करणार्‍यांनी जिल्ह्यासाठी काय केले? असा सवाल उपस्थित करत उमेदवाराच्या आजोबांनीच निळवंडेला विरोध केला होता असे सांगितले. राज्यात अनेक ठिकाणी मेडिकल कॉलेज झाले परंतु, अहमदनगरमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज होवू शकले नाही. सत्तेचा गैरवापर करुन यांनी ती होवू दिली नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार फाटका असला तरी समोरच्या उमेदवाराला उलथून टाकणार असल्याचा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, अहमदनगरच्या दक्षिणेतील प्रश्न सोडविण्यासाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश यांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, कोविड काळातील नीलेश लंके यांचे काम संपूर्ण जगाने पाहिले आहे. अनेकांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. त्यामुळे ते घराघरात पाहोचले आहेत. या निवडणुकीमध्ये राहुरी तालुक्यात लंके यांना सर्वाधिक लीड देण्याचा विश्वास त्यांनी दिला. तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचा घरपूस समाचार घेतला. यावेळी पदाधिकार्‍यांची भाषणे झाली.

शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी संसद बंद पाडणार: नीलेश लंके
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शेतकर्‍यांची अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ५० वर्ष राजकारण करणार्‍यांनी जिल्ह्यातील लोकांना झुलवत ठेवले आहे. त्यांनी विकासाच्या मुद्दयावर राजकारण केले पाहिजे. परंतु ते व्यक्तीगत पातळीवर टीका टीपण्णी करत आहेत. मतदारांनो तुम्ही फक्त एकदा विश्वास ठेवा तुम्हाला अभिमान वाटेल असे काम करुन दाखवीन असा विश्वास नीलेश लंके यांनी राहुरीच्या सभेत नागरिकांना दिला. आमदार, खासदार झाल्यावर संपत्ती वाढते. परंतु माझी संपत्ती कमी झाली आहे. सत्ता, संपत्तीच्या पाठीमागे पळणारे आपण नसून जनतेची सेवा करणारे आहोत. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळप्रसंगी संसद बंद पाडू असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...