spot_img
देशकरदात्यांना मोदी सरकारचे गिफ्ट

करदात्यांना मोदी सरकारचे गिफ्ट

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
एक लाख रुपयांपर्यंतच्या कर थकबाकी असलेल्या एक कोटीहून अधिक करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 13 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्राप्तिकर विभागाने 31 जानेवारी 2024 पर्यंत जुन्या थकबाकी कर दाव्याच्या मागण्या माफ केल्या आहेत. CBDT ने आपल्या आदेशात म्हटले आहे की, कोणत्याही करदात्याची कर मागणी 1 लाख रुपयांपर्यंत माफ केली जाईल.

CBDT ने आपल्या आदेशात म्हटले आहे की वर्ष 2020-11 साठी 31 जानेवारी 2024 पर्यंत प्रत्येक मूल्यांकन वर्षात 25,000 रुपयांपर्यंतच्या कर मागणीवर सूट देऊन ते रद्द केले जाईल. तर मूल्यांकन वर्ष 2011-12 पासून मूल्यांकन वर्ष 2015-16 पर्यंत, दरवर्षी 10,000 रुपयांच्या कर मागणीवर सूट देऊन ते रद्द केले जाईल. परंतु ही सर्व रक्कम मिळून एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी.

आयसीएआयचे माजी अध्यक्ष वेद जैन यांनी जुन्या कर मागण्या दूर करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांबद्दल सांगितले की, जुन्या कर मागण्या एका प्रकारे राइट-ऑफ टप्प्यावर दिसू शकतात. सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर, बेंगळुरूला दोन महिन्यांत या आदेशाची अंमलबजावणी करावी लागेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रयत शिक्षण संस्थेत सुरू झाला दळवी पॅटर्न; कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

  कान्हुर पठार मधील तो विकृत शिक्षक अखेर निलंबित पारनेर / नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील कान्हूर पठार,...

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...