spot_img
आर्थिककधी सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, निर्मला सीतारमण यांचा काय आहे प्लॅन..

कधी सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, निर्मला सीतारमण यांचा काय आहे प्लॅन..

spot_img

नवी दिल्ली : नगर सह्याद्री

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. कॅबिनेटसह इतर मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. यावेळेस सुद्धा अर्थखात्याची जबाबदारी निर्मला सीतारमण यांच्याच खांद्यावर आहे. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. मोदींच्या कामाची स्टाईल पाहता केंद्रीय अर्थसंकल्प हा 1 जुलै रोजीच सादर होईल असे काहींना वाटत आहे. पण युनियन बजेट या दिवशी सादर होणार आहे.

बिझनेस टुडे टीव्हीला केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी माहिती दिली. त्यानुसार, केंद्र सरकार जुलै महिन्याच्या मध्यावधीत आर्थिक वर्ष 2024-25 चा पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. त्यासाठीच्या मॅरेथॉन बैठकांचे सत्र पुढील आठवड्यात सुरु होईल. रिपोर्टनुसार, अर्थ मंत्रालय 17 जूनपर्यंत विभिन्न मंत्रालय आणि सहभागीदारांसोबत अर्थसंकल्प पूर्व बैठकांचे आयोजन करेल. मोदी सरकार विकासाचा अजेंडा पुढे रेटेल. निवडणूक घोषणापत्रातील आश्वासनाचे प्रतिबिंब या बजेटमध्ये दिसेल.

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजुजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पूर्ण बजेट जुलैच्या मध्यात सादर केले जाऊ शकते. त्यांनी X वर याविषयीची पोस्ट लिहिली आहे. 18 व्या लोकसभेचे पहिले सत्र 24 जून ते 3 जुलै दरम्यान होईल. यामध्ये नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. लोकसभा अध्यक्ष निवडले जातील. तर राष्ट्रपतींचे अभिभाषण पण सादर होईल. त्यानंतर दुसरे सत्र सुरु होईल. त्यात पूर्ण बजेट सादर करण्यात येईल.

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजुजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पूर्ण बजेट जुलैच्या मध्यात सादर केले जाऊ शकते. त्यांनी X वर याविषयीची पोस्ट लिहिली आहे. 18 व्या लोकसभेचे पहिले सत्र 24 जून ते 3 जुलै दरम्यान होईल. यामध्ये नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. लोकसभा अध्यक्ष निवडले जातील. तर राष्ट्रपतींचे अभिभाषण पण सादर होईल. त्यानंतर दुसरे सत्र सुरु होईल. त्यात पूर्ण बजेट सादर करण्यात येईल.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचे अंतरिम बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता. केंद्र सरकारने अद्याप पूर्ण अर्थसंकल्पाविषयीची कोणतीही माहिती सादर केलेली नाही. पण याविषयीच्या तयारीला वेग आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पहिल्या सत्रात कदाचित सरकार याविषयीची घोषणा करु शकते.

निर्मला सीतारमण मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील पूर्ण बजेट सादर करुन त्यांच्या नावावर एक विक्रम नोंदवणार आहेत. सीतारमण यांचा हा सलग सातवा अर्थसंकल्प असेल. यामध्ये सहा पूर्ण तर एका अंतरिम बजेटचा समावेश आहे. यापूर्वी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी पाच पूर्ण तर एक अंतरिम बजेट सादर केले होते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...