spot_img
ब्रेकिंगमहायुतीच्या एक्सप्रेसला मनसेच इंजन..! दिल्लीत 'डील', मनसे 'इतक्या' जागा लढवणार?

महायुतीच्या एक्सप्रेसला मनसेच इंजन..! दिल्लीत ‘डील’, मनसे ‘इतक्या’ जागा लढवणार?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपला साथ देऊन लोकसभेच्या रणांगणात उतरणार असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. त्याकरिताच्या वाटाघाटींसाठी राज हे दिल्लीत पोहोचले असून त्यानंतरच्या काही १५ तासांत काही गुप्त बैठका, चर्चा झाल्या आणि राज हे भाजपसोबत राहणार असल्याचे सांगण्यात आले. पुढच्या निवडणुकीत राज यांच्या पक्षाला मुंबईत एक किंवा दोन जागा मिळू शकतात. मात्र, त्यावर अजूनही खल सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

राज यांना आपल्याकडे ठेवून ठाकरे आणि पवारांविरोधात त्यांच्यात भाषेत आणि तशाच स्टाइलमध्ये रान उठविण्याची भाजपची नीती आहे. ठाकरे-पवारांकडचे ताकदवान नेते फोडल्यानंतर ही मंडळी भाजप आणि मित्रपक्षाच्या नाकीनऊ आणत असल्यानेच भाजपने आता राज यांच्या सभांचा उतारा शोधल्याची सध्या चर्चा आहे.

भाजपसोबत नेमया कोणत्या मुद्द्यांवर एकत्र यायचे, जागावाटप म्हणजे, मनसेला किती जागा मिळणार, त्या बदल्यात राज यांचा वापर कसा होणार, तो कुठे होणार, पुढच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय गणित कसे असेल, यावर राज हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा करू शकतात. त्याआधी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी राज यांची दिल्लीत भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली. त्यामुळे भाजप-मनसे हे नवे समीकरण मपरफेटफ असल्याचे स्पष्ट आहे.

दरम्यान, सोमवारी (१८ मार्च ) रात्री राज ठाकरे यांना दिल्लीतील काही पत्रकारांनी गाठलं. तेव्हा पत्रकार आणि राज ठाकरेंच्यात काही अनौपचारिक संवाद झाला. भेटीचं कारण आपल्याला ठाऊक नसल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. अन्यवेळी राज ठाकरेंच्या मकृष्णकुंजफ किंवा आता मशिवतीर्थफ निवासस्थानी इतर पक्षीय नेते, मंडळी येत असत. अगदी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, नारायण राणे यांनीही राज ठाकरेंच्या घरी झाऊन भेटीगाठी घेतल्या होत्या. पण, गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी चक्क राज ठाकरेंना दिल्लीला बोलावणं आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, उघड भेटीमुळे मनसे-भाजप युतीची नांदी सुरु झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...