spot_img
अहमदनगरअहमदनगर: नगरमध्ये तरुणावर शस्त्र हल्ला! 'या' भागात घडला प्रकार

अहमदनगर: नगरमध्ये तरुणावर शस्त्र हल्ला! ‘या’ भागात घडला प्रकार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
मावस भावाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरूणावर धारदार शस्त्राने व लोखंडी रॉडने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आसिफ मन्सुर सय्यद (वय ३४ रा. श्रीकृष्णनगर, कल्याण रस्ता, नगर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. रविवारी (दि. १७) रात्री साडेआठच्या सुमारास कल्याण रस्त्यावरील उध्दव अकॅडमीच्या मैदनावर ही घटना घडली.

जखमी सय्यद यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात खूनाचा प्रयत्न कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश नामदेव चौधरी, सागर बाळासाहेब गिते, मयुर काकळीज (पूर्ण नाव माहिती नाही) व आनंद खताळे (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. श्रीकृष्णनगर, कल्याण रस्ता, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

आसिफ यांना रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास त्यांचा मावस भाऊ इमरान बबन शेख यांनी फोन करून श्रीकृष्णनगर येथील उध्दव अकॅडमीच्या मैदनावर योगेश चौधरी, सागर गिते, मयुर काकळीज, आनंद खताळे हे मला मारहाण करत असल्याचे कळविले. आसिफ यांनी मित्र सोनू जगदाळे (रा. नेप्ती) याला सोबत घेत दुचाकीवरून अध्दव अकॅडमीचे मैदान गाठले.

तेथे त्यांना त्यांचा मावस भाऊ दिसला नाही म्हणून त्यांनी तेथे असलेल्या आनंद खताळे याला मावस भावाला मारहाण का केली याचा जाब विचारला असता आनंद खताळे व इतरांनी आसिफ यांच्यावर धारदार शस्त्र, लोखंडी रॉडने खूनी हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आसिफ यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Sujay vikhe patil : ‘विखे कुटुंबीयांचे योगदान जनता विसरणार नाही, विखेंनाच निवडून देतील’

राहुरी / नगर सह्याद्री Sujay vikhe patil : विखे कुटुंबीयांनी गेली तीन पिढ्यापासून जिल्ह्यासाठी...

मंदिरचा चौथरा पाडला, ग्रामस्थ आक्रमक; नगर तालुक्यातील ‘या’ गावात घडला प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री नवनागापूरमध्ये छत्रपती नगर परिसरात आठ महिन्यापूर्वी लोकवर्गणीतून ओपन स्पेसमध्ये बांधलेले शनी...

सुजय विखेंच्या रॅलीत झळकले संदीप कोतकरांचे बोर्ड…

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ कोतकर यांची भव्य बाईक रॅली अहमदनगर | नगर...

Ahmednagar crime : अतिक्रमणावरून गौरी घुमट परिसरात राडा

अहमदनगर | नगर सह्याद्री Ahmednagar crime : अतिक्रमण काढण्यावरून गौरी घुमट परिसरात दोन गटात हाणामारीची...