spot_img
ब्रेकिंगआमदारांना आमच्या योगदानाचा विसर, साडेचार वर्ष आम्ही फार भोगले..? कामोठेकरांनी भर सभेत...

आमदारांना आमच्या योगदानाचा विसर, साडेचार वर्ष आम्ही फार भोगले..? कामोठेकरांनी भर सभेत मांडले मत

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
खासदार डॉ विखे पाटील हेच पारनेर तालुका दहशतमुक्त करु शकतील. गेली साडेचार वर्ष आम्ही फार भोगले आहे. माजी आमदाराने या ठिकाणी येऊन आम्हाला धमक्या दिल्या आहेत. आमदार करण्यासाठी मुंबईकरांनी जे योगदान दिले त्याचा विसर पडला आहे.

खासदार विखे पाटील हेच या गुंडागर्दीला आळा घालू शकतील असे सक्षम नेतृत्व खासदार पुन्हा विक्रमी मताधिक्याने खासदार होतील यासाठी मुंबई पासून ते जिल्ह्यापर्यंतचे सर्व जनता एकमुखाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची खात्री कामोठे परिसरातील मान्यवरांनी दिली.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पारनेरकर, विजुभाऊ औटी मित्र परिवार व कोमोठे सांस्कृतिक युवा मंडळ आणि संदीप पाटील जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे दि. ७ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामोठेकरांनी आपले मत मांडले.

गुंडागर्दी थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार: खा. सुजय विखे पाटील
खासदार विखे पाटील यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपद होणार असून गेली दहा वर्षात सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले असून भाजपने मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. पारनेर तालुक्यात कशाप्रकारे गुंडागर्दी सुरू आहे हे सत्य समोर आहे. विकासाच्या नावाखाली काय सुरू आहे हे लोकांच्या लक्षात उशीरा आले आहे. आज जर लोकप्रतिनिधींना जर गोळ्या घालण्याच्या धमक्या देण्याचे काम होत असेल तर सर्वसामान्य जनता किती असुरक्षित आहे याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. पारनेर तालुक्यात गेली साडेचार वर्षात जी गुंडागर्दी सुरू आहे ती थांबवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून तालुक्यातील जनतेलाही आधारवड राहील अशीच भुमिका सातत्याने घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...